लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: मुक्त शिक्षण पध्दतीचा गैरफायदा घेत काही संशयितांनी २० विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश न घेता प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विज्ञान पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन (एमएलटी) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) या शिक्षणक्रमाला २० विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता तसेच शिक्षण न घेता चार संशयितांनी त्यांना विद्यापीठाच्या नावाने बनावट गुणपत्रक, पदवी, पदविका तसेच विद्यापीठाच्या बनावट नावासह पदवी पडताळणीचे बनावट पत्र तयार केले. ते विद्यार्थ्यांना देत बनावट दस्तऐवज तयार केले. संशयित विद्यार्थ्यांनी पॅथालॉजी व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील पॅरावैद्यक परिषदेकडे कागदपत्रे सादर केली असता हा प्रकार उघड झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी ती मुक्त विद्यापीठाकडे सादर करण्यात आली. त्यावेळी विद्यापीठाच्या उत्तीर्ण यादीत संबंधित मुलांची नावे आढळली नाहीत. पडताळणीत विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले.

आणखी वाचा-नाशिक : कळवण तालुक्यातून गाईंची वाहतूक; मालमोटार देवळा पोलीस ठाण्यात जमा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता त्यांनी बनावट प्रमाणपत्र मिळविल्याची कबुली दिली. त्यांनी संशयितांची नावे सांगितली. विद्यापीठाच्या वतीने नागपूर येथील सेंटर फॉर एज्युकेशनचा गौरव शिरसकर, कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रमेश होनामोरे, अहमदनगर येथील अशोक सोनवणे, मनमाड येथील संजय नायर यांच्याविरूध्द नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.