जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जिल्ह्यातील माहेजी ते परधाडे स्थानकांदरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरून प्रवाशांनी साखळी ओढत गाडी थांबवून उड्या मारल्या. त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली अनेक प्रवासी सापडले. त्यापैकी १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ जण जखमी आहेत.

लखनऊ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास भुसावळहून मुंबईकडे रवाना झाली होती. पाचोरा तालुक्यातील माहेजी ते परधाडे स्थानकांदरम्यान गाडी आली असता पावणेपाचच्या सुमारास इंजिनलगतच्या द्वितीय श्रेणीतील डब्यात आग लागल्याची अफवा पसरली.

Rangava dies in accident in Sangamner news
संगमनेर मध्ये प्रथमच आढळला रानगवा, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू !
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Fifty eight people died in horrific accident at Kanhan railway crossing near Nagpur 20 years ago
२० वर्षांपूर्वीच्या भीषण रेल्वे अपघाताचे स्मरण, काय घडले होते?
4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
accident with Cattle smuggling truck 35 animals killed
गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात… ३५ जनावरे दगावली…
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव

हेही वाचा : Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…

आरडाओरड सुरू झाल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी तत्काळ गाडी थांबवली आणि डब्यातून उड्या मारल्या. त्याचवेळी बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने रूळावर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. त्यात काही प्रवासी गाडीखाली आल्याने चिरडले गेले, काही दूर फेकले गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चार प्रवासी गंभीर जखमी आणि १६ किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना जळगावसह पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. सर्व जखमींना जळगावसह पाचोरा येथे दाखल करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार स्मिता वाघ व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याला वेग देऊन आढावा घेतला.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वरात उद्यापासून संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून जाहीर केले आहे.

रेल्वे अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माहिती घेतली. स्थानिक प्रशासन सर्व ती मदत करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना असून, जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडो. -अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत आहे. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader