जळगाव : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. महापालिकेत मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर सकाळी दहाला कोर्ट चौकापासून मिरवणुका निघाल्या. शहरात मिरवणुकांत ७० पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळांचा सहभाग आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास रांगेवरून मंडळांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी होऊन दोन जण जखमी झाले. जिल्ह्यात सुमारे एक हजार ३६३ सार्वजनिक मंडळांकडून गणरायाचला निरोप दिला जात आहे. शहरात गुरुवारी सकाळी दहाला महापालिकेत मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर कोर्ट चौकापासून विसर्जन मिरवणुकांना जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते आरती झाली.

याप्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सहायक आयुक्त उदय पाटील यांच्यासह उपायुक्तांसह अधिकारी, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. आयुक्त डॉ. गायकवाड, सोनगिरे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी विसर्जन मिरवणुकीत ठेका धरला होता. जयनारायण चौकात सार्वजनिक गणेश महामंडळातर्फे वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. सुभाष चौक गणेश मित्रमंडळातर्फे मिरवणुकीतील सहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांना अन्न पाकिटांचे वाटप केले जात आहे. यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने नवीपेठ गणेश मंडळ द्वितीय स्थानी होते. कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मंडळांचे गणपती मिरवणुकांच्या रांगेत होते. मात्र, मिरवणुकांची रांग थेट नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत दुपारी बारापर्यंत पोहोचली होती.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश

हेही वाचा : मनमाड : विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

अनेक मंडळे रांगेत उभे राहत होते. मिरवणुकांत विविध भागांतून ढोल-ताशे, लेझीम तसेच विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर करणार्‍या पथकांचाही सहभाग होता. सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुकांत विविध विषयांवर सामाजिक, धार्मिक संदेश देणारे सादर केलेले देखावे, आरास जळगावकरांचे आकर्षण ठरले. मिरवणुकांत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. मिरवणुका नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, चौबे शाळा चौक, दधीची चौक, रथ चौक, सुभाष चौक, पांडे डेअरी चौकमार्गे मेहरुण तलाव येथे गणेशाला निरोप दिला जात होता. शहरात महापालिकेसमोर, टॉवर चौक, घाणेकर चौक, चौबे शाळा चौकात तात्पुरते वाहतूक नियंत्रक दिवे बसविले. तेथे लाल दिवा लावल्यानंतर मंडळांतर्फे १० मिनिटे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले जात होते.

हेही वाचा : जायकवाडी : जलसंपदा विभागाचे दोन विसंगत अहवाल, महसूलमंत्र्यांचा आक्षेप

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे किसनराव नजन-पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्यासह अधिकारी लक्ष ठेवून होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मेहरुण तलावावर विसर्जन तयारीची पाहणी केली. त्यांनी बोटीतून तलावातून फेरफटकाही मारला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी तेथे नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांना काही सूचना केल्या. विसर्जन मिरवणुकांवर ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर होती. मेहरुण तलावावर गणेश घाट व सेंट टेरेसा स्कूलकडील काठ अशा दोन ठिकाणी गणेश विसर्जन केले जात आहे. यासाठी नऊ तराफे, चार क्रेन व तीन बोटींसह पट्टीचे पोहणारे १५ तरुण होते. मेहरुण तलाव भागातील गुंजन मंगल कार्यालयासमोर, श्रीकृष्ण मंगल कार्यालयानजीक भागासह तीन ठिकाणी वाहनतळे आहेत. यंदा निमखेडी भागातील गिरणा नदीवर विसर्जनास बंदी आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या प्रारुप याद्या प्रसिद्ध

मिरवणुकीच्या रांगेवरून हाणामारी; दोन जखमी

कोर्ट चौकात विसर्जन मिरवणुकीच्या रांगेवरून बुधवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास मंडळांच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यात दोन कार्यकर्ते जखमी झाले. कोर्ट चौकात सार्वजनिक गणेश मंडळांनी रांगा लावल्या जात होत्या. याच रांगेवरून नेहरू चौक मित्रमंडळ व माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांत वाद झाला. त्याचे पर्यावसन जोरदार हाणामारीत होऊन आयुष गांधी हा गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय, अन्य एका कार्यकर्त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर फायटरने वार केल्याचे सांगण्यात आले. मारहाण करणार्‍यांना तत्काळ अटक करावी यासाठी शहर पोलीस ठाण्यात जमाव दाखल झाला होता. मात्र, कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून, हा किरकोळ वाद सामंजस्याने सोडविला गेल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

हेही वाचा : Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पालकमंत्री दादा भुसेही ढोल वादनात मग्न

शहरात ठिकठिकाणी निर्माल्य संकलन

महापालिकेच्या मदतीला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे एक हजार २५० श्री सदस्य शहरात निर्माल्य संकलन करीत होते. त्यासाठी २० वाहने ठेवण्यात आली होती. महापालिकेतर्फे सात ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्रे होती. स्वयंसेवक, गणेशभक्त व श्री सेवकांमार्फत निर्माल्य संकलन केले जात होते. मेहरुण तलावातील गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, शिवाजी उद्यान, सागर पार्क, चंदूअण्णानगर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधी कॉलनी, नेरी नाका आदी ठिकाणी ५ ते २० श्री सदस्य होते. शिवाय, महापालिकेचे डी-मार्ट, काव्यरत्नावली चौक, सिंधी कॉलनी, आकाशवाणी चौक, कोर्ट चौक, सुभाष चौक या भागांत निर्माल्य संकलित जात होते. महापालिकेचे कर्मचारी, कामगार, मुकादम, आरोग्य निरीक्षकांसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाची वाहने व मजूरही दिमतीला होता. शिवाय, शहरातील त्यात युवाशक्ती फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांतर्फेही निर्माल्य संकलन केले जात आहे.

हेही वाचा : जळगाव शहर बससेवेचा मार्ग मोकळा, जुन्या स्थानकाची जागा देण्यास एसटीची तत्त्वतः मान्यता

शहरासह जिल्ह्यातील बंदोबस्त

जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अपर पोलीस अधीक्षक, दहा उपविभागीय पोलीस अधिकारी, ३३पोलीस निरीक्षक, १४४ उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, ३३७७ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, गृहरक्षक दलाचे १४७७ जवान, १० स्ट्रायकिंग फोर्स, ३ दामिनी पथके, ८आरसीपी पथके, २ क्यूआरटी पथके असा बंदोबस्त होता. शहरासह उपनगरातील चौकाचौकांत पोलीस तैनात करण्यात आले होते. शहरात सीसीटीव्हीसह ड्रोन कॅमेर्‍यांची नजर होतील. शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह दंगानियंत्रण पथक, तसेच सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अंमलदारांसह कर्मचारी मिरवणुकीच्या नियोजित मार्गांवर तैनात होते.