नाशिक: मेरी ते रासबिहारी लिंक रोडवर रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा विभाग दोनने ताब्यात घेतले असून त्यांना म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रशांत तोडकर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) हा रिक्षाचालक होता. तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. शनिवारी रात्री घराबाहेर पडलेला प्रशांत घरी परतलाच नाही. प्रशांतची हत्या करण्यात आल्याची माहिती रविवारी सकाळी पोलिसांकडून प्रशांतच्या कुटूंबियांना देण्यात आली. प्रशांतच्या घरी दोन भाऊ, बहीण, आई, वडील आहेत.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात वृद्ध दाम्पत्याला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप; देवाच्या दारी भक्तांशी मुजोरी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक गुन्हे शाखा विभाग दोनने मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करुन संशयितांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड येथे रवाना केले. निगडी येथील थरमॅक्स चौकात सापळा रचत विजय आहेर (३०, रा. रामवाडी), संकेत गोसावी (२६, रा. जुईनगर), प्रशांत हादगे (२९, रा. पेठरोड), कुणाल पन्हाळे (३०, रा. दिंडोरी रोड) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता विजय आहेर आणि तोडकर यांच्यात मागील काही दिवसात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवत प्रशांतची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली.