नाशिक: हाणामारी, लूटमार, दगडफेक, वाहनांची तोडफोड अशा घटना कायमच घडणारे सिडको रविवारी मध्यरात्री गोळीबार तसेच तलवारी फिरवणाऱ्या टोळक्यामुळे हादरले. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एका टोळीकडून दुसऱ्या टोळीवर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून सहा संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सिडको परिसरातील वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोन सराईत गुन्हेगारांमध्ये रविवारी वाद झाले. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटलाही होता. रात्री साडेअकराच्या सुमारास दोंदेने शिर्केला त्रिमूर्ती चौकापासून काही अंतरावर असलेल्या मटाले नगरातील जीएसटी भवनाजवळील चौकात बोलावून घेतले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. दोंदेने गावठी बंदूक शिर्केवर रोखली. जीव वाचवण्यासाठी शिर्के पळाला. दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र नेम चुकल्याने शिर्के वाचला. गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला.

drugged woman high voltage drama caught on camera strips naked demands sex at jamaica airport video viral
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
nashik stone pelting marathi news, nashik violence marathi news
नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक
couple sleep on seat together Passengers angry post on couples on flight goes photo viral
Photo : हद्दच झाली राव! विमानात कपलचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर सीटवर झोपून…
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी

हेही वाचा : सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश

भरवस्तीत आणि चौकात हा प्रकार घडला. आरडाओरड करणाऱ्यांच्या हातात तलवारी होत्या. ते पाहून भयभीत झालेल्या रहिवाशांनी आपापल्या घरांमध्ये धाव घेत दरवाजे बंद करुन घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तपास करुन या प्रकरणी दर्शन दोंदे (२९, रा. कामटवाडे), गणेश खांदवे (२८, रा. पाथर्डी फाटा), राकेश कडू (३२, रा. उत्तमनगर), खग्या उर्फ अथर्व राजधर (२०, रा. प्रशांतनगर) बट उर्फ अजय राऊत (२७, रा. साधुवासवानी रोड), जितेंद्र चौधी उर्फ छोट्या काळ्या (३६, रा. सिडको) यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :नाशिक: भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोन जखमी

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही मुख्य संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी या प्रकरणात शिर्के याला तक्रारदार बनवले. गोळीबार झाला तेव्हा शिर्के हा तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवत होता, असे म्हटले जाते. या दोन्ही गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांची त्यांना भीती वाटत नाही. परिसरातील रहिवाशांना धमकावण्याचा सातत्याने त्यांच्याकडून प्रयत्न होत असतो.

हेही वाचा :जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

सिडकोत गुन्हेगारीचा वाढता आलेख

सिडकोत सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत असतात. याआधी कपालेश्वर मंदिराचे विश्वस्त प्रशांत जाधव यांच्यावर कल्पतरू हॉस्पिटलनजीक गोळीबार करण्यात आला होता. जाधव यांच्या पायाला जखम झाली. राकेश कोष्टी प्रकरणही गाजले. पवन नगरात रोहित मल्याने हवेत केलेला गोळीबार, चुंचाळे भंगार बाजारात झालेला गोळीबार अशी काही गोळीबाराची प्रकरणे आहेत. सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी कारवाया पाहता आतापर्यंत पाच ते सहा वेळा अंबड पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. पोलिसांकडून कठोर कारवाई न करता गुन्हेगारांची संबंधित परिसरात धिंड काढण्यावर धन्यता मानली जाते. उलट, धिंड काढण्यामुळे गुन्हेगारांची दहशत अधिक वाढत आहे. त्याऐवजी संबंधित परिसरात गुन्हेगारांना रहिवाशांसमोर चोप देण्याची गरज संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.