नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून जमीन खरेदी व्यवहारात मध्य प्रदेशातील एका व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या नाशिक येथील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील सीतानगर बी ब्लॉक येथील कौशलेन्द्रसिंह कुशवाह यांनी यासंदर्भात तक्रार केली होती.

हेही वाचा : मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार नाशिक येथील नीलेश शिंदे आणि नितिन काळे यांनी कुशवाह यांच्याशी जमिनीचा व्यवहार केला. त्यांनी गोदामसाठी जमीन मंजूर असल्याचे बनावटपत्र सादर करून तीन लाख रुपये घेतले. संशयितांनी सरकारी मान्यतेचे कागदपत्र असल्याचा दावा केला. परंतु, चौकशीत हिंदुस्थान पेट्रोलियमचे भोपाळ येथील उपव्यवस्थापक प्रशांत कुमार शुक्ला यांनी, नीलेश शिंदे आणि नितिन काळे हे कंपनीचे कर्मचारी नाहीत. तसेच अशा प्रकारचे कोणतेही अधिकृत पत्र देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस तपासात संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. शिंदे आणि काळे यांच्या विरोधात फसवणूक, कागदपत्रांची कूटरचना, बनावट कागदपत्रांचा वापर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.