नाशिक : सुरगाणा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगाराच्या साहित्यासह पाच हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुरगाणा शहरातील धिरज टेक्सटाईल सेंटरसमोर बांगड्याच्या दुकानाच्या आडोशाला मिलन नावाचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार खेळतांना केशव देशमुख (३०,रानपाडा.सुरगाणा ) याला अटक करण्यात आली. यावेळी रोख पाच हजार ८४० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशीच कारवाई यापुढेही सुरु ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा : “भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट”, एमआयएमचे आमदार फारुक शाह यांची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक पोलीस शांत कसे ?

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकले. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू, जुगार अड्डे चालविणारे सापडले. बाहेरील अधिकाऱ्यांना जर या कारवाया करणे सहज शक्य होत असेल तर मग स्थानिक पोलीस याविषयी अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.