नाशिक : अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार संशयित अशपाक पठाण याला ताब्यात घेण्यात खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. अशपाक (२२, रा. बजरंगवाडी, विल्होळी नाका) हा दिंडोरी रोडवरील मायको रुग्णालय परिसरात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना मिळाली होती.

हेही वाचा : धर्मांतरितांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून वगळा; डीलिस्टिंग मेळाव्यात घटना दुरुस्तीची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी मायको दवाखाना परिसरात सापळा रचला. अशपाक याला ताब्यात घेतले. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.