नाशिक : कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या संशयावरून शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली जात आहे. सलीम कुत्ताचा १९९८ मध्ये मृत्यू झाला, असे काँग्रेसच्या आमदाराने विधानसभेत सांगितले. कुत्ताच्या तीन बायकांनीही तो मयत झाला असल्याचे नमूद केले असताना ठाकरे गट आणि त्यांच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला.

हेही वाचा : “कागदपत्रे बनावट निघाल्यास एसीबी कार्यालयात गळफास घेणार”, ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा इशारा

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप करुन छायाचित्र आणि चित्रफिती उघड केल्या होत्या. निमित्त साधून पालकमंत्री दादा भुसे यांनीही बडगुजर यांना लक्ष्य केले. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणा करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशीही सुरू झाली आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमिवर, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांनी राजकारणाचा स्तर अतिशय खालावत असून असे राजकारण याआधी कधीही पाहिले नसल्याचे नमूद केले. विधानसभेत काँग्रेस आमदाराने सलीम कुत्ता हा १९९८ मध्ये मयत झाल्याचे समोर आणले आहे. कुत्ताच्या तिन्ही पत्नींनी तो मयत झाल्याचे म्हटले आहे. कुत्ता १९९८ मध्ये मयत झाला असताना आता नवीन कोण धरून आणला, ज्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा प्रश्न गायकवाड यांनी केला.

हेही वाचा : अमळनेरमधील मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलनाचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी व्यक्ती अस्तित्वात नाही, ज्याचा मृत्यू झाला आहे, त्याच्यासोबत नाचले, गायले म्हणणे चुकीचे आहे. काही वर्षांपूर्वी दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला अनेक राजकीय पक्षाचे नेते गेले होते. त्याची छायाचित्रे व लग्न सोहळ्याची पत्रिका समाजमाध्यमात पसरल्यानंतर लग्न पत्रिकाही बदलली गेली होती, असा दाखला गायकवाड यांनी दिला. ठाकरे गटासह त्यांच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण कुणीही करू नये, असे आवाहन त्यांनी केले.