यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यंदाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे सर्वसाधारण विजतेपद १० पारितोषिकांसह कोल्हापूर विभागाने पटकावले. येथील विद्यापीठाच्या आवारातील दृक्श्राव्य इमारतीत व शैक्षणिक सभागृहात झालेल्या या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळ्याला परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील उपस्थित होते. या केंद्रीय युवक महोत्सवातून निवडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ आयोजित ‘इंद्रधनुष्य २०२२’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इंद्रधनुष्य महोत्सव नोव्हेंबरमध्ये होत आहे. विद्यापीठाच्या नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद या आठ विभागीय केंद्रातून १५० विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले होते.

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून झोकून देऊन काम केल्यास मिळणाऱ्या यशाचा आनंद वेगळा असतो, असे मिलिंद गुणाजी यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांशी त्यांचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम रंगला. त्यांनी त्यांच्या भटकंतीमधील रंजक गोष्टीही सांगितल्या. सांस्कृतिक प्रगतीतूनच विद्यार्थी माणूस म्हणून घडत जातो, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. प्रा. डॉ. विजया पाटील यांनी या स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आगामी इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जाईल, असे जाहीर केले. सूत्रसंचालन दृक श्राव्य विभागाचे प्रशांत कुलकर्णी आणि नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार सचिन शिंदे यांनी केले. परीक्षक म्हणून श्रीराम वाघमारे, सई पाटील, आनंद अत्रे, भूपाली देवरे, आदिती नाडगौडा, अमीत घरत, प्रशांत भरवीरकर, संजय वाघ, केशव कासार, विजया येवलेकर यांनी काम पाहिले.

हेही वाचा : “आत्ता मंत्रीपद मिळालं नाही तर…”, आमदार बच्चू कडूंचं मंत्रीमंडळ समावेशाबाबत सूचक विधान!

स्पर्धानिहाय निकाल- शास्त्रीय नृत्य – प्रथम – प्रशांत काजरेकर (पुणे), शास्त्रीय वाद्य संगीत (तालवाद्य) – प्रथम- सुजीत तांबे (कोल्हापूर), द्वितीय- श्वेता पाटील (मुंबई), समूहगीत (भारतीय)- प्रथम – साबजी वारंग (कोल्हापूर), द्वितीय – पायल वाघमारे (नाशिक), समूहनृत्य (लोकनृत्य) – तारपा नृत्य – मुंबई, शास्त्रीय नृत्य – प्रथम- आस्था दहेकर, द्वितीय- कल्याणी शिंगडे, मिमिक्री – प्रथम- श्रवण अडोडे. व्यंगचित्रे – प्रथम- वाणीश्री लोहार (कोल्हापूर), मातीकला प्रथम – गोपाळ वडवाळे (नांदेड), द्वितीय- विशाल मूतनाले (कोल्हापूर), भित्तिपत्रक – सिद्धांत तलवडेकर (कोल्हापूर) , स्पॉटफोटोग्राफी – प्रथम- ओमजीत शिवणे, प्रश्नमंजुषा- प्रथम – नाशिक आणि अमरावती विभागून, द्वितीय- नांदेड विभागीय केंद्र, वक्तृत्व – प्रथम- अनुराज कटला (नांदेड), द्वितीय- साक्षी गवळी (नांदेड), वादविवाद – प्रथम- उद्धव दशरथे, द्वितीय-सार्थक बधान, एकांकिका- प्रथम- हा वास कुठुन येतोय (कोल्हापूर) , द्वितीय – सुरू (मुंबई), प्रहसन – प्रथम – वय वर्ष ७५ (कोल्हापूर), मुकाभिनय – प्रथम – इंडियन सोल्जर (नांदेड), द्वितीय- मोबाईलचे दुष्परिणाम (नाशिक), स्थळचित्रण- प्रथम- कुंजल पोटे (अमरावती), द्वितीय प्राची शिवणे (कोल्हापूर), रांगोळी- प्रथम- संकेत शिनगारे (नांदेड), द्वितीय- स्नेहा रताळे (अमरावती) यांचा समावेश आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur division winner central youth festival of open university nashik tmb 01
First published on: 13-10-2022 at 14:00 IST