मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथे २८ वर्षीय विवाहितेने मुलगा व मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळास कंटाळून तिहेरी आत्महत्येचा हा प्रकार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षाली राहुल अहिरे (२८), मुलगा संकेत (५) व मुलगी आरोही (७) या तिघांचे मृतदेह सौंदाणे शिवारातील स्वतःच्याच विहिरीत आढळून आले. चारित्र्याच्या संशयावरून सासरचे लोक तिचा छळ करीत होते,तसेच उपाशीपोटी ठेवून वेळोवेळी तिला मारहाण करीत होते. त्यामुळे काही काळ ती माहेरी निघून गेली होती.

या संदर्भात तिने सासरच्या लोकांविरोधात महिला समुदेशन केंद्रात अर्जही दाखल केला होता. मात्र उभयपक्षी तडजोड झाल्यानंतर हर्षाली पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली होती. मात्र तिचा छळ सुरूच राहिला व त्याला कंटाळून तिने दोन्ही मुलांसह आत्महत्येसारखे पाऊल उचलले,अशी तिच्या माहेरच्या लोकांची तक्रार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान,हर्षालीची आई ठगूबाई देवरे (ढाढरे, धुळे) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती राहुल सासू, कांताबाई,सासरा दिलीप व ननंद सपना या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी या करीत आहेत.