नाशिक : दम्याच्या आजारावर उपचारासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील राकेश अहिरे दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबईला गेले होते. रुग्णालयात उपचार घेऊन ते गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी निघाले होते. परंतु, नौदलाच्या स्पीडबोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. त्यांचा अहिरे कुटूंबातील तिघांचा समावेश आहे.

अहिरे यांचा पाच वर्षाचा मुलगा निधेश याला दम्याचा आजार होता. त्याच्यावर मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी तिघे मुंबई येथे गेले होते. उपचारानंतर नाशिकला येण्याआधी राकेश अहिरे हे पत्नी हर्षदा यांच्या माहेरी थांबणार होते. त्याआधी गेटवे ऑफ इंडियाजवळ जल सफारीचा आनंद घेण्यासाठी बुधवारी अहिरे कुटूंब गेले.

हेही वाचा…कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राकेश, हर्षदा आणि निधेश तिघेही बोटीत बसले. समुद्रात काही अंतर गेल्यानंतर त्या बोटीला नौदलाच्या स्पीडबोटने धडक दिली. या अपघातात अहिरे कुटूंबियांतील तिघांचा मृत्यू झाला. राकेश यांचा बुडून मृत्यू झाला. तर हर्षदा आणि निधेश यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा राकेश यांचे वडील नाना अहिरे आणि कुटूंबियांवर मोठा आघात झाला आहे. तीन दिवसांपूर्वी मुलगा, सून आणि नातवाची भेट अखेरची ठरल्याने अहिरे कुटूंबियांच्या भावना अनावर झाल्या.