मनमाड – मनमाड ते लासलगाव रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या धडकेत मोराचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, येथील सरस्वती हायस्कूलपुढे अनिल दराडे यांच्या वस्तीजवळ ही घटना घडली. जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकातून निघाल्यानंतर काही अंतरावर एक्स्प्रेसची धडक बसल्याने मोराचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी विठ्ठल मोते या मार्गावर गस्त घालत होते. त्यांना दोन लोहमार्गाच्या मधील भागात मोर पडलेला दिसला. त्यांनी तातडीने वन्यपशू मित्र भागवत झाल्टे यांना माहिती दिली. त्यांनी वन विभागाला ही घटना कळवली. वन विभागाचे कर्मचारी अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झाल्टे, वनसेवक इरफान सय्यद यांनी पंचनामा करून मोराला ताब्यात घेतले.