नाशिक : मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केल्यास होणारे दहा फायदे सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी मांडले आहेत. सकल हिंदू समाजातर्फे येथे बुधवारी सायंकाळी आयोजित हिंदू हुंकार सभेत चव्हाणके यांच्यासह इतरही संत, महंतांनी मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सभेत चव्हाणके यांनी मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केल्यास होणारे दहा फायदे सांगितले. त्यात मुस्लिम मुलीला सवती ठेवण्याची गरज राहणार नाही. तप्त तापमानातही बुरखा घालण्यापासून सुटका होईल. संपत्तीत अर्धा वाटा मिळेल. तीन वेळा तलाक म्हणून कुणीही फारकत देणार नाही. पुनर्जन्माची हमी मिळेल. सात जन्मापर्यंत साथ मिळेल यासह इतरही काही वादग्रस्त फायदे चव्हाणके यांनी मांडले आहेत. नाशिकमध्ये एका वर्षात पाचशेपेक्षा जास्त मुली लव्ह जिहादच्या बळी ठरल्या असून गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे तोंड, डोळे, कान बंद करुन गप्प बसणार काय, आमच्या बहिणीकडे वाईट नजरेने कोणी पाहणार असेल तर शांत बसणार काय, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण बुलडोझर भेट देवून योगी आदित्यनाथ जसे करतात, त्याप्रमाणे करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिन्नरच्या एमआयडीसीत बांगलादेशी घुसखोर असून जिल्ह्यात बांगलादेशी हटाव मोहीम हाती घेतली जाईल. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाही आजही काश्मीरमध्ये नऊ वर्षात नऊ हिंदू देखील जाऊन राहू शकले नाहीत. जिल्ह्यातील पेठ, हरसूल, त्र्यंबक या भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, कठोर धर्मांतर बंदी कायदा केला पाहिजे, गोहत्या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे, मोदी यांनी अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करावे, देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावे आदी मागण्या चव्हाणके यांनी केल्या.

हेही वाचा… धरणस्थिती मांडणाऱ्या वृत्तमालिकेबद्दल ‘लोकसत्ता’च्या अनिकेत साठे यांचा सन्मान

हेही वाचा… Maharashtra News Live: “..तर मग सगळ्याच समस्या त्यांना कळवा, ते पत्र लिहितील आणि…”, राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया!

या सभेत लव्ह जिहाद, आदिवासींसह ग्रामीण भागात आमिष दाखवून करण्यात येणारे धर्मांतरण यांचा निषेध करण्यात आला. यावेळी आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी हरिगिरी, स्वामी भारतानंद सरस्वती, स्वामी शांतिगिरी, अण्णासाहेब मोरे, भक्तिचरणदास महाराज, स्वामी सोमेश्वरानंद, महामंडलेश्वर रघुनाथबाबा, डाॅ. रामकृष्ण महाराज लहवितकर, नागेश्वरानंद महाराज यांनीही मार्गदर्शन केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten benefits for muslim girls of marrying hindus statements made by leaders in hindu hunkar sabha asj
First published on: 23-03-2023 at 13:54 IST