नाशिक – ऑनलाईन गेमिंगचा युवा वर्गाला पडलेला विळखा पाहता सरकार या अर्थपूर्ण खेळावर निर्बंध आणत आहे. अशा स्थितीत येवला तालुक्यातीत एका १९ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या चर्चेचा विषय झाला आहे. त्याने पब्जी या ऑनलाईन खेळामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले जात असले तरी ही आत्महत्या मानसिक तणावातून झाली असल्याची शक्यता येवला तालुका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
येवला तालुक्यातील देवळाणे येथील यशराज बोर्डे हा तालुक्यातील बाभुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता. घरापासून दूर असल्याने त्याला पालकांकडून भ्रमणध्वनी घेवून देण्यात आला होता. तो घरी काही कामानिमित्त आला होता. परंतु, बुधवारी तो घरातून बेपत्ता झाला. यशराज सापडत नसल्याने येवला तालुका पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दिली होती. त्याचा शोध सुरू असतांना शेताजवळील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. पोलीस तसेच नातेवाईकांना याविषयी ग्रामस्थांनी माहिती दिली. पब्जीच्या व्यसनातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात पाठवला. यशराजच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, यशराजने लिहिलेली एक भावनिक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिले असून, त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचे दिसते, अशी माहिती येवला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली. यशराजचा भ्रमणध्वनी तपासला असता प्रथमदर्शनी ऑनलाईन खेळातून हा प्रकार झालेला नसल्याचे लक्षात येते. मात्र तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्याच्या पालकांनीही तो खेळ खेळत होता ही गोष्ट नाकारली. मात्र भ्रमणध्वनीमध्ये तो युट्युबवर सतत काही पाहत असायचा, असे पालकांनी सांगितल्याची माहिती पोलीस निरीक्षक मंडलिक यांनी दिली. अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याने खेळासाठी तो जीव देईल, असे वाटत नाही. पुढील तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले.
यशराजने चिठ्ठीत हिंदीतून मजकूर लिहिला आहे. मैंने जो किया वो पहली बार नही हैं. मैंने बहुत बार यह कोशिश की हैं. लेकिन आज तक कामयाब नही हुआ. लेकिन आज लगता हैं मैं कामयाब हो जाऊंगा. मैं तो पाच साल पहलेही मर चुका हूँ. बस, मेरा शरीर जिंदा हैं. मेरे दिमाग ने बस ये पॉसिबिलिटी और इलुजन बनाया हैं की मुझे सब कुछ मिलेगा, जो चाहिये. लेकिन पाच साल बाद पता चला की मेरे दिमाग सिर्फ मेरी बॉडी जिंदा रखना चाहता हैं. सारी चीजे एक इलुजन थी और फेक थी. कभी कुछ ऐसा नही हुआ, जैसा सोचा था. मेरा दिमाग बस मेरी बाॅडी जिंदा..