नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे राखणाऱ्या मोहित खन्ना यांच्या घरात १६ लाखांची चोरी झाली आहे. यात विविध दागिने आणि ९ लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली असून या प्रकरणी घरकाम करणाऱ्या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कैलास चंद्रा, सुनील यादव आणि प्रमोद यादव असे संशयितांची नावे आहेत. वाशी सेक्टर ८ येथील खन्ना व्हीला मध्ये मोहित खन्ना आपल्या कुटूंबीया समवेत राहतात. त्यांच्या कडे कैलास चंद्रा, सुनील यादव आणि प्रमोद यादव हे तिघे कामगार काम करीत होते. काही दिवसांपूर्वी घरातील सोन्याचे दागिने हरवण्याच्या घटना घडत होत्या तर कपाटातील रोकड हे कमी झाल्याचे खन्ना यांच्या लक्षात आले.

हेही वाचा : नवी मुंबई : वीज पुरवठा पुन्हा खंडित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे त्यांनी घरातील सर्व दागिने व रोकड यांची मोजदाद केली त्यात कपाटात ठेवलेले ९ लाखांची रोकड, ५० हजार रुपयांच्या दोन अंगठ्या, ५ तोळे वजनाचे १ लाख रुपयांचे कडे, २ लाखांची सोनसाखळी,३ लाखांची हिऱ्याची अंगठी, ५० हजाराची एक अंगठी या वस्तू आढळून आल्या नाहीत. या चोरी विषयी मालकाला कुणकुण लागली असल्याचे कळताच हे तिन्ही कामगार अचानक बेपत्ता झाले. फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार हा प्रकार २४ मे २०२१ पासून सुरू आहे . या बाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.