१३ फेब्रुवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील क्रीडा संकुल येथे १७ व्या डी.वाय. पाटील टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डी.वाय. पाटील क्रीडा संकुलाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून, नेहमीप्रमाणे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द गाजवलेल्या नामांकित भारतीय खेळाडूंचा यामध्ये सहभाग आहे. शिवाय अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठीसुद्धा ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

स्पर्धेत डी.वाय. पाटील ए आणि डी.वाय. पाटील बी या डी.वाय. पाटील क्रीडा समुहाच्या टीमसोबतच इंडियन ऑइल, टाटा, आरबीआय, इन्कम टॅक्स, रिलायन्स वन, इंडियन नेव्ही, एअर इंडिया, बीपीसीएल, मुंबई कस्टम्स, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा, सीएजी, जैन इरिगेशन आणि सेंट्रल रेल्वे अशा अनेक नामांकित टीमचा सहभाग होणार आहे. आजपासून सुरू झालेले हे क्रिकेट सामने डी वाय पाटील विद्यापीठाचा ग्राउंड आणि डी वाय पाटील स्टेडियम येथे प्रामुख्याने खेळवले जाणार आहेत. दिनांक २३ फेब्रुवारी रोजी उपांत्यपूर्व सामने आणि २५ फेब्रुवारी या दिवशी उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा – नवी मुंबई : पाण्याअभावी व्हर्टिकल गार्डन प्रयोग ठरतोय अपयशी ? दरवर्षी होतोय लाखो रुपयांचा चुराडा

हेही वाचा – नवी मुंबई : सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकामाला पालिकेचे अभय ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई, नवी मुंबई आणि रायगड या परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमींना पर्वणी ठरणाऱ्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुलाचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील यांच्या नेतृत्वात होत असून, सर्व क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून या क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉक्टर विजय पाटील यांनी केले.