नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात बुधवारी सकाळी सहापासून गुरुवारी सकाळी आठपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे प्रचंड उकाडा सहन करावा लागला. त्यातच मान्सूनपूर्व कामासाठी म्हणून पाणी बंद असल्याने एकीकडे पाणीबाणी आणि दुसरीकडे विजेचा लपंडाव अशा दुहेरी चक्रात पूर्ण दिवस आणि रात्र गेली.

कोपरखैरणे नोडमध्ये बोनकोडे आणि सेक्टर २० येथे महावितरणचे दोन विभाग कार्यालये आहेत. त्यात बुधवारी बोनकोडे कार्यालयअंतर्गत असणाऱ्या सेक्टर १ ते १३ मध्ये मान्सूनपूर्व कामासाठी पाच तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. सकाळी दहा ते तीन दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असे नियोजन असताना सेक्टर ९ मध्ये सकाळी ८ पासून वीजपुरवठा खंडित झाला होता. संध्याकाळी साडेसहा सातपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. संध्याकाळी सातनंतर बहुतांश भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. तर, सेक्टर २० येथील महावितरण कार्यालयअंतर्गत असणाऱ्या सेक्टर १४ ते २० मध्ये कुठलेही शटडाऊन नसताना रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. रात्री बारा ते सकाळी आठपर्यंत पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी आठनंतर मात्र वीजपुरवठा सुरळीत झाला.

हेही वाचा – नवी मुंबई : गृहिणीची लसूण फोडणी महागली; एपीएमसीत लसणाची २० ते ३० रुपयांनी दरवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र रात्री १२:४८ वाजता कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तम प्रतिसाद देत वाढत्या उकाड्याने विजेच्या वापरात अचानक वाढ झाल्याने काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची माहिती दिली.