नवी मुंबई : करोना प्रादुर्भावानंतर नवी मुंबई महापालिकेने नेरुळ येथे उभारलेली प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात आली असून आता येथे दिवसाला ५ हजार आरटीपीसीआर चाचण्या करणे शक्य होणार आहे. 

या प्रयोगशाळेचे सिमेन्स इंडिया लि. कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून विस्तारीकरण करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे,  खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईत महापालिकेच्या एकही प्रयोगशाळा नव्हती. मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव शहरात सुरू झाल्यानंतर येथील संशयीत रुग्णांची स्वॅब घेऊन ते मुंबईत पाठवले जात होते. त्या ठिकाणी निदान होऊन अहवाल येत होता. त्यात विलंब होत असल्याने व वेळीच संशयीत रुग्ण बाधित असल्याचे न कळाल्याने प्रादुभाव वाढ होता. ही गरज ओळखून नवी मुंबई महापालिकेने तातडीने आपल्या नेरुळ येथील माताबाल रुग्णालयात ही प्रयोगशाळा उभारली. तिचे करोनाकाळात मोठे योगदार राहिले आहे. या प्रयोगशाळेची क्षमताही वळोवेळी वाढविण्यात आली आहे.

आता शहरात करोनाची तिसरी लाट आली तर संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आरोग्य सुविधांची तयारी ठेवली आहे. यात खाटांत वाढ करण्यात आली असून एरोली व नेरुळ यथील रुग्णालये करोनासाठी सज्ज ठेवली आहेत. याबराबरोच या प्रयोगशाळेची क्षमताही वाढविण्यात आली आहे. प्रयोगशाळेत २ हजारांवरुन  यापुढील काळात दिवसाला ५ हजार आरटीपीसीआर चाचण्या शक्य होणार आहेत. ही समाधानकारक बाब असल्याचे यावेळी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच करोनानंतरच्या काळातही विविध तपासण्या या प्रयोगशाळेमध्ये होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सिमेन्स कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अर्जुन चव्हाण तसेच प्रयोगशाळेच्या विभागीय अधिकारी डॉ. संगीता बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.

६,३६,०७३ चाचण्या

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्याया लाटेत एकही दिवस खंड न घेता अथक कार्यरत राहून ३० ऑक्टोंबपर्यंत या ठिकाणी ६ लाख ३६ हजार ७३ इतक्या आरटीपीसीआर मोफत चाचण्या करण्यात आल्या असून ३८ कोटी इतक्या खर्चाची बचत झाली आहे.