नवी मुंबई : कळंबोलीत राहणारे जसपाल सिंग खोसा (वय ४८) हे नेहमी प्रमाणे आपल्या श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यास एका उद्यानात गेले होते. मात्र त्यांची हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

आज सकाळची ही घटना असून कलंबोली येथे राहणाऱ्या जसपाल सिंग खोसा (वय ४८) यांची हत्या तिक्ष्ण हत्याराने केल्याचे उघडकीस आले आहे. खोसा हे नेहमी प्रमाणे आपल्या श्वानास घेऊन साईनगर वसाहती समोरील उद्यानात फेर फटका मारण्यास गेले होते. मात्र याच उद्यानाच्या एका काहीशा आडपशाच्या जागेवर रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह मॉर्निंग वाँक करण्यास आलेल्या काही जणांनी पहिला. ही माहिती पोलिसांना मिळताच कळंबोली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.

हेही वाचा… गणेश नाईक यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेचं पोलीस स्टेशनमध्ये पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेमुळे उद्यानात दररोज मार्निंग वाॅक करणा-यांमध्ये भितीचे वातावरण होते. साईनगर उद्यानात पुरेसे दिवे असल्याने अंधाराचा फायदा उचलत गर्दुल्यांकडून या उद्यानाचा सर्रास वापर केला जातो. हत्येचे नेमके कारण समजले नसले तरी पोलिस मारेक-यांचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.