नवी मुंबई: दुचाकी आणि रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींच्या कडून ३ लाख ४० हजार रुपयांच्या ३ स्कुटी आणि २ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. हि कामगिरी एपीएमसी पोलिसांनी केली आहे.
सतिश रामशरिफ चौहान, (वय २४ वर्षे, ) राहणार- मानखुर्द , आणि अफजल फिरोज खान, (वय २२ वर्षे,) राहणार- मुंबा असे अटक आरोपींची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी एपीएमसी परिसरातून रिक्षा चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आढळून आले तसेच तांत्रिक तपास केला असता त्यात आरोपी कुठल्या दिशेला गेले हे समोर आले. त्यांचे फोटो खबऱ्यांना दिल्यावर त्यांनी दोन्ही चोरट्यांची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर सदर आरोपीतांना सापळा लावून मानखुर्द परिसरातून ताब्यात घेण्यात आले. व त्यांचे कडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी ए.पी.एम.सी पोलीस ठाणे व नेहरूनगर पोलीस ठाणे, हददीतुन चोरी केलेल्या २ रिक्षा तसेच ३. स्कुटी जप्त करण्यात आल्या आहेत.हि कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनविर शेख, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पथकाने केली आहे.
हेही वाचा >>>पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या आरोपी पैकी अफजल हा स्वतः रिक्षा चालक होता. त्यामुळे रिक्षा व्यवसाय आणि गॅरेज वाल्यांशी त्याच्या ओळखी होत्या. त्याचा आधार घेत तो चोरी केलेल्या वाहनांना ग्राहक बघून येईल त्या किमतींना विकून टाकत होता. विशेष म्हणजे विकताना एखाद्या भंगार मध्ये निघालेल्या गाड्यांचे क्रमांक त्या गाडीला देत होता. तसेच दुचाकीही स्वस्तात विकून टाकत होता. या दोघांनी मिळून अजून काही वाहन चोरी केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्याचा तपास पोलीस करीत आहेत.