नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत जुना बटाटा अधिक असून आता राज्यातील नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सातारा आणि पुण्यातील बटाटा आवक होण्यास सुरुवात झाली असून पुढील कलावधीत नवीन बटाटा हंगाम सुरू होणार आहे.

कांदा बटाटा बाजार समितीत सद्यस्थितीत गुजरात, मध्यप्रदेश, युपी या परराज्यातुन जुन्या बटाट्याची आवक अधिक सुरू आहे. सप्टेंबरमध्ये नवीन बटाटा दाखल होतो. बाजारात महाराष्ट्रातील तळे गाव ,पुसेगाव, वाई, सातारा येथील बटाटा आवक सुरू होते.

हेही वाचा… पनवेलमध्ये ४८ दिवसांत डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण

बुधवारी बाजारात बटाट्याच्या ५३ गाड्या दाखल झाल्या असून त्यापैकी २ गाड्या नवीन बटाटा दाखल झाला आहे. नवीन बटाटा हंगाम सुरू होताच जुन्या बटाटा दर कमी होण्यास सुरुवात होते. एपीएमसीत जुन्यापेक्षा नवीन बटाटा दर अधिक आहेत. जुना बटाटा प्रतिकिलो १३-१४रुपये तर नवीन बटाटा २०-२२रुपये दराने विक्री होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक मधील बाजार बंदीने कांद्याची आवक रोडावली

नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांनी निर्यात शुल्क आणि विविध मागण्यांसाठी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नाशिक बाजारात कांद्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प असून त्याचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील पडत आहे. नेहमी बाजारात १००हुन अधिक गाड्या दाखल होतात.मात्र नाशिक मध्ये कांदा विक्री ठप्प आहे असल्याने एपीएमसीत ७१गाड्या दाखल झाल्या असून गणेशोत्सवामुळे ग्राहक रोडावले असून कांद्याचे दर मात्र १८-२४ रुपयांवर स्थिर आहेत.