संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार सिडको व द आर्ट ऑफ लिव्हींग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी द्वितीय आंरतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला . या दिनानिमित्त् प्रदर्शन केंद्र वाशी येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे फायदे जाणून घेण्यासाठी नवी मुंबई, मुंबई व ठाणे या भागतील सर्व वयोगटातील सुमारे ४००० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते.
आमदार मंदा म्हात्रे, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे व द आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे कृष्णकुमार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने योग शिबिराची सुरुवात करण्यात आली.
द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिवस शिबिरामध्ये नवी मुंबई व इतर परिसरातील नगारिकांसोबत विविध शाळांचे विद्यार्थी व रुग्णालयातील डॉक्टर्सनी उत्सर्फुतपणे सहभाग नोंदवला. सकाळी ७ वजात या योगसत्राची सुरुवात करण्यात आली. द आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे या शिबिरामध्ये योग सत्रे घेण्यात आली. या माध्यमातून त्यांनी विविध योगासने व ध्यानधारण यांची प्रात्यक्षिके दाखवली. प्रात्यक्षिके दाखविताना प्रशिक्षकांनी उपस्थितांना योगाचे दैनंदिन जीवनासाठी फायदे सांगितले. तर उपस्थितांना या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून निरामय जीवनाचा कानमंत्र मिळाला. तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य व दंत चिकित्सा कॅप्पचे आयोजन देखील करण्यात आले होते. तर आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने विविध पुस्तके व इतर उत्पादने विक्रीसाठी प्रदर्शित केली होती. या प्रदर्शनाच्या माध्यामातून नागरिकांना योग व ध्यानधारण आणि आध्यत्म अनुभविता आले.