उरण : देशातील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून उरणची नोंद झाली असतांना गेल्या सरत्या वर्षात उरणमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५० ते २०० च्या पातळीवर राहिला आहे. ही मात्रा मानवी शरीरासाठी घातक म्हणून गणली जाते. या हानिकारक दूषित हवेमुळे वर्षभर उरणकरांचा श्वास कोंडला आहे. या स्थितीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईत २६६ मद्यपींना दट्ट्या

सध्या मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील वाढत्या प्रदूषणाची दखल येथील स्थानिक प्रशासनाने घेत त्यासाठी च्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र दुसरीकडे या दोन प्रमुख शहराचे उपनगर असलेल्या उरण आणि परिसरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता खालावू लागली आहे. येथील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित आस्थापनाना देण्यात आल्या असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. असे असले तरी वर्षभर सातत्याने येथील हवेतील धुळीकणात वाढ होऊ लागली आहे. हवेचा वाढता गुणवत्ता निर्देशांक सामान्य पातळीवर आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या वर्षी उरण पनवेल राष्ट्रीय महामार्ग आंदोलन करीत उरण सामाजिक संस्थेने केले होते. त्यावेळी काही प्रमाणात तात्पुरती नियोजन झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. उरण परिसरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दोन ठिकाणी नोंदणी केली जात असल्याचा ही दावा केला आहे. तसेच येथील धूलिकणात वाढ झाली आहे. मात्र ही हवा घातक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर मानवी शरीरासाठी चांगल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक नियमावली नुसार निर्देशांक मात्रा ही ० ते ५० किंवा १०० पर्यंत चांगली मानली जाते. परंतु १०१ ते १५० पर्यंतचा निर्देशांक ही पातळी निरोगी व्यक्तीला ही हानिकारक मानली जात आहे. तर त्यापुढील नोंद ही अति घातक पातळीवर मानली जाते. उरणची हवेची गुणवत्ता ही अनेकदा ३०० पार ही पोहचली आहे. त्यामुळे उरण मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा >>> राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थंडीतील धुके की धुरके सध्या उरणमध्ये दिवसभर ढगाळ आणि धुक्याचे वातावरण पसरले असते. वातावरणातील दिवसभराच्या धुक्यामुळे वातावरणात धुके की धुरके याचा अंदाज येत नाही. धुरक्यात नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायॉक्साईड, कार्बन डायॉक्साईड या घातक वायूंचे प्रमाण अधिकचे असल्याने मानवी शरीरावर याचे परिणाम होण्याची शक्यता वाढत आहे. वाढत्या हवा प्रदूषणा पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना दिली जात आहे.