नवी मुंबई महानगरपालिकेने शहर स्वच्छतेमध्ये देशात नावलौकीक मिळवला असून शहराने एक मानाचा स्तर स्वच्छतेत गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत उच्चस्तर गाठण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन कामाला लागण्याचे निर्देश अतिरिक्त कार्यभार असलेेले आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छताविषयक बैठकीत दिले आहेत.

हेही वाचा- VIDEO: “अरे एवढी वर्षे राजकारण करूनही बारामती शरद पवारांचं होऊ शकलं नाही, असं कधी…”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची स्वच्छता स्थिती चांगली असली तरी आता प्रत्येक शहरात जागरुकता आली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली असून याची जाणीव ठेवून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट आहे याचे भान राखावे आणि आपली गुणवत्ता अधिक उंचाविण्यासाठी दुर्लक्ष करू नये असे आयुक्तांनी निर्देशित केले. स्वच्छता कामाशी संबंधित प्रत्येकाने आपला अधिकाधिक वेळ हा क्षेत्रीय स्तरावर कामातील गुणवत्ता वाढीसाठी दिला पाहिजे असे स्पष्ट करीत त्यानुसार कामाच्या वेळेचे नियोजन करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

हेही वाचा- सिडकोचे कोटींचे भूखंड बेकायदा रोपवाटिका चालकांना आंदण, पालिका व सिडकोचे दुर्लक्ष

विभाग अधिका-यांनी रात्रीचे दौरे करून या कामाचे नियमित परीक्षण करावे. स्टॉल धारकांना ओला व सुका कच-यासाठी स्वतंत्र डबे ठेवणे अनिवार्य करावे. तसेच स्वच्छता परीक्षणासाठी विभागवार नेमलेल्या विभागप्रमुख स्तराच्या नोडल अधिका-यांनी आपापल्या विभागात दौरे सुरु करावेत व स्वच्छतेमध्ये सुधारणा होईपर्यंत त्या कामांचा पाठपुरावा करावा.घराघरातून कचरा वर्गीकरण हे आपले प्रमुख लक्ष्य असून त्यादृष्टीने आपली क्षमता वाढवा तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, संस्था याठिकाणी ‘बल्क वेस्ट जनरेटर प्रकल्प’ राबविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांची संख्या वाढविण्याची व्यापक स्वरुपात कार्यवाही करावी.कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट मॉडेल’ हा अत्यंत प्रभावी उपक्रम असून त्यामध्ये नवी मुंबई आघाडीवर आहे याचा अभिमान बाळगताना त्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक झोपडपट्टीत झिरो वेस्ट स्लम मॉडेल राबविण्यासाठी गतीमान कार्यवाही करावी. स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून आपली बलस्थाने ओळखून ती अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

हेही वाचा- रायगड : वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका उद्योग क्षेत्राला

सार्वजनिक शौचालये नागरिकांना दररोज वापरावी लागत असल्याने तेथील स्वच्छतेमध्ये किंचीतही तडजोड खपवून घेतली जाणार नाही त्याबाबतची जबाबदारी निश्चित करून त्या कामात निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी य दिले. यावर्षी एमआयडीसी भागातील सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे ही चांगली गोष्ट असल्याचे सांगत आयुक्तांनी तेथील उद्योग समुहांकडून त्याच्या उद्योगाच्या पुढील परिसर सुशोभित करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असे सूचित केले. उद्यानांचे शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असून नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असणारी उद्यानांसारखी विरंगुळ्याची ठिकाणे सर्वोत्तम राहतील याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा- नवी मुंबई : अति खराब हवेवर हिरवळीचा उतारा ! शहरात हरित पट्टा आणि पाण्याचे कारंजे बसवून हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छ व सुशोभित शहर ही नवी मुंबईची ओळख असून ती टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे.शहर स्वच्छतेबाबत अधिक सतर्क राहून क्षेत्रीय स्तरावर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून व विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग घेऊन शहर स्वच्छतेची उंची वाढवावी, अशी माहिती नवी मुंबई महापालिकाचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.