सध्या अनेक भागात क्षणात कडक ऊन्ह व क्षणार्धात जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत त्यामुळे भाद्रपदात श्रावण बरसण्याचा आनंद नागरिकांना मिळत आहे. मात्र उन्ह पडलंय म्हणून पावसापासून बचावाच साधन नसल्याने आडोसा शोधावा लागत आहे. यावर्षी ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण कमी होते मात्र सप्टेंबर मध्ये विजेच्या कडकडाट सह पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी श्रावणात पावसाने दडी मारल्याने सध्या भाद्रपदात ती भरून निघत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : मनपा पाठोपाठ पोलीस आयुक्तालय क्षेत्र वाढ ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण परिसरात मंगळवारी रात्रीपासून पावसाळा सुरुवात झाली आहे. तर बुधवारी ती कायम असतांना अचानकपणे कडक उन्ह पडत आणि क्षणार्धात जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. याचा अनुभव उरणकर घेत आहे. साधारणतः सप्टेंबर मधील पाऊस हा परतीचा पाऊस समजला जातो आणि हा पाऊस बहुतांशी रात्रीच्या वेळी येतो मात्र सद्या तो दिवसा ही कोसळू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.