नवी मुंबई – नवी मुंबईत करोनाच्या काळात औषधे चोरली, पाणी चोरले, नागरीकांच्या सोयायुविधांचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले. त्यामुळे या सर्वांचा हिशोब आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत चुकता करणार असा गंभीर आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. नवी मुंबईत आज गणेश नाईक यांना अधिकाऱ्यांची, माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांच्यासमवेत विविध समस्यांबाबत सिडको प्रदर्शनी केंद्रात बैठक घेतली होती. त्यावेळी नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यंमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले.
मुंबईच्या हक्काचे बारवी धरणातून मिळणारे ४० एमएलडी पाणी न मिळाल्यानेच शहरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. पाणी चोरांमुळे नवी मुंबई तहानलेली राहिली आहे असा आरोपही नाईकांनी केला.
बैठकीला माजी खासदार डॉ. संजीव नाईक, महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी अध्यक्ष रामचंद्र घरत, यांच्यासह विविध प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री गणेश नाईक यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.त्याची प्रचिती आजच्या बैठकीतही पाहायला मिळाली.नवी मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी सभागृह नसल्याने नगरसेवकांना दोष देताच येत नाही. पाणीटंचाई हे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. पालिका प्रशासन नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येते.
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभी राहीली. परंतू करोना काळात नवी मुंबईला सिडकोने मदत करण्याऐवजी मुंबई, ठाण्यात मदत केली. त्यामुळे नवी मुंबईतील हक्काचे पाणी चोरायचे आणि दुसरीकडे नवी मुंबईत पाणी नाही असा आरोप करायचा असा आरोप नाईकांनी शिंदे यांच्यावर केला आहे.
तर दुसरीकडे मंदा म्हात्रे यांनी विरोधकांवर आरोप करायचे त्यांना चोर म्हणायचे जनतेला एकदा सांगून तरी टाका चोर कोण आहेत ते.त्यामुळे जना जनार्दन सब जानती है चोर कोण आहे ते असा सवाल मंदा म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांकडे केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदेवर आरोप करताना नवी मुंबईतील भाजप आमदारामध्येच कलगीतुरा अधिक रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे. आहे.