मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजार समिती हिरवी मिरचीची आवक कमी होत असून मागणी वाढल्याने दरात ४० टक्के वाढ झाली आहे. बाजारात १५ हून अधिक गाड्या दाखल होत होत्या. मात्र, आता १० ते ११ गाड्या आवक झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर वाढत होत आहे . मागील आठवड्यात प्रत्येक किलो १६ ते २२ रुपयांनी उपलब्ध असलेली हिरवी मिरची आता प्रती किलो २४ ते ४० रुपयांनी विक्री होत आहे.

नवी मुंबई : एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याची दरवाढनवी मुंबई शहरातील “स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला” लवकरच “बांगर” बुस्टर

एपीएमसी बाजारात मार्चमध्ये हिरव्या मिरचीच्या दराने इतिहासात प्रथमच उच्चांक गाठला होता. मार्चमध्ये घाऊक बाजारात प्रति किलो १४० रुपयांवर पोचली होती. परंतु एप्रिल-ऑगस्ट मध्ये हिरव्या मिरचीचे दर आटोक्यात येण्यास सुरुवात झाली. मागील महिन्यापासून सर्वच भाज्यांची दर उतरले आहेत. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे दरही अवाक्यात येण्यास सुरुवात झाली होती. बाजारात सर्वच भाज्या १० ते २० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हिरवी मिरची ही प्रति किलो १६ ते २३ रुपयांनी उपलब्ध होती. गुरुवारी बाजारात २ हजार २४९ क्विंटल हिरवी मिरची दाखल झाली आहे. बाजारात दररोज १५ हून अधिक गाड्या हिरवी मिरची दाखल होत असते. परंतु आज गुरुवारी केवळ १० ते ११ गाड्या आवक झाली आहे. तसेच मागील दोन दिवसापासून हिरव्या मिरचीची वागणी वाढली आहे. त्यामुळे दरात ४०% टक्क्यांनी वाढ झाल्याचे मत व्यापारी श्रीकांत मोहिते यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील “स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला” लवकरच “बांगर” बुस्टर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन दिवसंपासून दरात वाढ होत आहे. या आधी घाऊक बाजारात प्रतिकिलो १६-२२ रुपयांवर उपलब्ध असलेली मिरची आता २३-४० रुपयांवर पोहचली आहे. ७ ते १८ रुपयांनी भाव वधारले आहेत. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून हिरवी मिरची दाखल होत असते. सध्या बाजारात २ हजार हुन अधिक क्विंटल मिरची दाखल होत आहे. मात्र मागणीनुसार पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. घाऊक बाजरात दर वधारले असल्याने किरकोळ बाजारात देखील दरवाढ झाली आहे.