नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या बेसमेंट मध्ये आडोशाला दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने या ठिकाणी रात्रीच्या अंधारात वा सुट्टीच्या दिवशी पार्ट्या झडत असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेत झाडाझडती सुरु केली आहे. 

हेही वाचा- नवी मुंबई: कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांना जोडे मारा आंदोलन

 राज्यात आधुनिक आणि सुसज्ज महानगर पालिका मुख्यालय इमारतीती नवी मुंबई मनपाच्या इमारतीचे नाव आवर्जून घेतले जाते. या इमारतीवरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असून चोवीस तास आवारावरील सर्व  प्रवेश द्वारावर सुरक्षा रक्षक शिवाय प्रत्यक्ष इमारतीत प्रवेश जाताना स्कॅनर मेटल डिटेक्टर आदी ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय स्वच्छता ग्रह वगळता इमारतीच्या कानाकोपऱ्यात  सीसीटीव्हीचे जाळे आहे मात्र हि सर्व व्यवस्था भेदून दारूच्या बाटल्या आणून पार्ट्या चालतात की काय अशी शंका उपस्थित होत आहेत. याचे कारण म्हणून पार्किंग जागेच्या एका कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. बाटल्याचा खच पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. कोणाच्या तरी नजरेस हे पडले आणि त्याचे फोटो व्हायरल होताच इमारत प्रशासन अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सुरवातीला बाटल्या नेमक्या कुठे आहेत याचा शोध घेतला त्यावेळी अनेक कानाकोपऱ्यात मद्याच्या बाटल्या सिगारेट थोटकेही मोठ्या प्रमाणात आढळून आले. यानंतर या ठिकाणी असणारी सुरक्षा रक्षक, वाहन चालक शिपाई यांची झाडाझडती घेण्यात आली.

हेही वाचा- पनवेल: तळोजा सबवे दुरुस्तीकरता दोन दिवस बंद राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगला मालवे ( उपायुक्त स्थापत्य) हे निदर्शनास आल्या नंतर सुरक्षा रक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. हे कृत्य करणारे कोण याचा शोध सुरु असून यासाठी प्रसंगी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे. सध्या सर्वत्र साफसफाई करण्यात आली असून यापुढे असले प्रकार होऊ नये म्हणून योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.