उरण : वायू विद्युत केंद्रात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात होरपळलेल्या तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. मात्र मंगळवारी दगावलेल्या उरणच्या डोंगरी गावातील तंत्रज्ञ कामगार कुंदन पाटील यांच्या भावाने एक मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार जेवणाची वेळ झाली असल्याने आधी जेवून घेऊ या अशी सूचना कुंदने केली होती. मात्र काम पूर्ण करूनच जेवूया असे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने हे तिघेजण काम करीत राहिले आणि तो स्फोट झाला,त्याचवेळी जर जेवणाची सुट्टी घेऊन घटनेच्या ठिकाणावरून ते तिघेजण बाहेर पडले असते तर कदाचित या कामगारांचे जीव वाचू शकले असते अशी माहिती कामगाराने आपल्या भावाला दिल्याचे भावाने स्पष्ट केले आहे. या घटनेतील ही माहिती समोर आल्याने तसेच रविवारची सुट्टी असल्याने घटनेच्या ठिकाणी कामगारांची संख्या कमी होती अन्यथा यापेक्षा अधिक कामगारांना आपला जीव गमवावा लागला असता.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

कामाच्या ताणाचेही कारण समोर

या घटनेनंतर वायू विद्युत केंद्रातील कामगारांच्या अधिक कामाच्या ताणाचे ही कारण पुढे आले आहे. मयत कामगार कुंदन पाटील यांच्या भावाने सांगितलेल्या अनुभवा नुसार कुंदन हा प्रकल्पात २४ -२४ तास काम करीत असे. त्यामुळे त्याला विश्रांती मिळत नव्हती असाही गौप्यस्फोट मंगळवारी त्याच्या भावाने कुंदनच्या निधनानंतर वायू विद्युत केंद्रात झालेल्या प्रशासन आणि ग्रामस्थांच्या बैठकीत केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रकल्पात कामाची वेळ किती असाही प्रश्न उपस्थित करून कामाचे तास ८ आहेत की २४ याची विचारणा व्यवस्थापनाला केली. त्यावेळी व्यवस्थापन निरुत्तर झाले होते. याची दखल घेतली जाईल असे मत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

हेही वाचा : नवी मुंबई : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन तरुणांचे संसार उध्वस्त

या घटनेत मृत्यू झालेले तीन कर्मचारी हे अवघ्या चाळीशीतले होते. यातील अभियंता विवेक धुमाळे(३२),विष्णू पाटील(४०)तर कुंदन पाटील (३५) या वयाचे होते. धुमाळे यांना साडेचार वर्षाचा एक मुलगा आहे. तर त्यांची पत्नी विष्णू पाटील यांना (१०) वर्षाची एक मुलगी आहे.कुंदन याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते.या घटनेमुळे तिन्ही तरुण कामगारांचे संसार उध्वस्त झाले आहेत.