रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याचा अहवाल रेल्वे मंडळाला सादर केल्यानंतर नवी मुंबईतील पहिली मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ही सेवा सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. डिसेंबपर्यंत बेलापूर ते पेंदार या मार्गावरील पेंदार ते खारघरच्या सेंट्रल पार्क या पाच किलोमीटर लांबीचे काम पूर्ण केले आहे. नवी मुंबईच्या दक्षिण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम मे २०१२ रोजी सुरू केले आहे. ही सेवा पहिल्या चार वर्षांत सुरू होईल असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र अनेक कारणास्तव हा मार्ग सात वर्षांत सुरू झालेला नाही.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची देखभाल व प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारी अभियंता हे महामेट्रोला काम देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील पेंदार ते खारघर या किमान पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम झाले असून हा मार्ग जानेवारी महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने केले गेले आहेत. रेल्वेच्या र्सिच डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑरगानायझेशन (आरडीएसओ) चे वेग आणि इतर प्रमाणपत्र ऑक्टोबरमध्ये मिळालेले आहे. ऑसिलेशन चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि या सेवेसाठी आवश्यक असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा चाचणी सोमवारपासून सुरू झाली होती. दोन दिवस या सुरक्षा पथकाने पाच किलोमीटर लांबीच्या अंतरावर मेट्रो चालविणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याची पाहणी केली आहे. या मार्गावरील चाचणी बरोबरच मेट्रोचे डब्बे यांचीही पाहणी केली. हे पथक आता हा अहवाल रेल्वे सुरक्षा मंडळाला सादर करणार आहे. त्यानंतर रेल्वे मंडळ या सेवेला हिरवा कंदील दाखविणार आहे. त्यामुळे किमान पहिला टप्पा तळोजा ते खारघर हा सुरू होणार आहे.

मेट्रोसह अतिजलद बोटसेवा लवकरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रोची अंतिम सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. यामुळे ही सेवा सुरू होण्यासाठी आता रेल्वे मंडळाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे. त्याच प्रमाणे दुसरी एक महत्त्वाची वाहतूक सेवा म्हणजे मुंबई, नवी मुंबई जलवाहतूक. याचेही काम पूर्ण झाले असून त्याचीही चाचण्या सुरू आहेत. या दोन महत्त्वाच्या वाहतूक सेवा लवकरच नवी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.