Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्धाटन होणार आहे.
८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे पंतप्रधान मोदी बुधवारी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याची सुरुवात करतील. या दौऱ्यात ते विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी बुधवारी दुपारी ३ वाजता नवी मुंबई येथे पोहोचतील आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाहणी दौरा करतील. त्यानंतर ३:३० वाजता ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील आणि विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करतील. या प्रसंगी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित असतील.
Navi Mumbai Airport Launch 2025 Live Today | पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटन
“दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागतंय, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण – अतुल पाटील”
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फर्स्ट लूक पाहिलात का? पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडीओ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे थोड्या वेळातच उदघाटन होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच मी उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी निघालो असल्याचेही ते म्हणाले.
“उद्घाटनाआधीच नवी मुंबई विमानतळावरील विमानं पाहण्यासाठी नागरिकांची महामार्गावर गर्दी”
Navi Mumbai Airport : सविस्तर : विमानतळाच्या नावाचा प्रवास आणि ‘दिबा’ नावाचा इतिहास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई विमानतळ उद्घाटन दौऱ्यापूर्वी सुरक्षेत वाढ; युनायटेड किंगडमचे पंतप्रधानही मुंबईत
Navi Mumbai Airport Inauguration: नवी मुंबई विमानतळाच्या उद्धाटनापुर्वी लोकनेते दि.बा.पाटीलांचे चिरंजीव काय म्हणाले?
Atul Patil on Navi Mumbai International Airport Inauguration नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्धाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईत येत आहेत. या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे यासाठी गेली अनेक वर्ष ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. वाचा सविस्तर वृत्त
Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: विमानतळ परिसरात स्व. दी. बा. पाटील यांच्या नावाचे बॅनर
नवी मुंबई विमानतळाला ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यातील भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. त्यामुळे या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला होता. केंद्र सरकारही नावाबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप याची औपचारिक घोषणा झाली नव्हती.
मात्र आज विमानतळ उदघाटनापूर्वी विमानतळ परिसरात दि. बा. पाटील यांच्या नावाचे फलक आणि कमानी दिसून आली आहे. त्यामुळे दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याची चर्चा आहे. मात्र औपचारिक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यानंतर होईल, असे सांगितले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई विमानतळ उद्घाटन दौऱ्यापूर्वी सुरक्षेत वाढ; युनायटेड किंगडमचे पंतप्रधानही मुंबईत (फोटो: प्रातिनिधिक छायाचित्र )