नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालंय अंतर्गत असणाऱ्या कोपरखैरणेत मेफेड्रोन या अंमली पदार्थ वितरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडे ७२ लाख रुपये किंमतीचा १८२.१२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. ही कारवाई कोपरखैरणे पोलिसांनी केली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी “नशा मुक्त नवी मुंबई” अभियान अधिक जोरकस पणे राबवणे सुरु केले आहे. नुकतेच अंमली पदार्थ प्रकरणी मकोका कलमातर्गत सहा आरोपीना अटक केले आहे. आज अशाच कारवाईत दोघांना अटक केली आहे. अशीच कारवाई आज ( शुक्रवारी ) पहाटे करण्यात आली आहे. या कारवाईत निखील राजकुमार वागासे,( वय ३२ वर्षे, काम कन्स्ट्रक्शन, ) आणि मसुद अब्दुल सलाम खान, (वय ४० वर्षे, काम सुपरवायझर) यांना अटक करण्यात आले

घनसोली रेल्वे स्टेशन परिसरात निखील वाघमारे नावाचा इसम एम.डी. अंमली पदार्थ विकी करिता येणार आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांना मिळाली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांना देताच त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केले ज्यात गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, अभितीत मोरे पोलीस हवालदार सुनिल चिकणे, हणमंत किर्वे पोलीस शिपाई मुकिंदा सोनलकर, मनोहर जाधव, राहुल डोंबाळे, निलेश निकम यांचा समावेश होता.

मिळालेल्या माहिती नुसार या पथकाला घनसोली रेल्वे स्टेशन परिसरातील सेंट्रल पार्कच्या विरूध्द बाजूला संशयित व्यक्तीं आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता निखील राजकुमार वागासे याच्या कडे ४४ लाख रुपयांचे ११२.३८ ग्रॅम एम डी आढळून आले तर त्याचा साथीदार मसुद अब्दुल सलाम खान याच्या कडे २८ लाख रुपये किंमीतीचे ६९.७४ ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला.

दोन्ही संशयित आरोपी कडे मिळून आढळून आलेला ७२ लाख रुपये किमतीचा १८२.१२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले १३ लाख ५० हजार रुपये किंमतीची किया सोनेट मोटार कार असा एकूण ८५ लाख ५०हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.