उरण : पोलिसांनी घराचे दार ठोटावून उरण मधील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी प्रकरणी मूळ नेपाळ मधील अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. या प्रकरणातील एक महिला व साथीदार मात्र फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोराकडून साडेतीन लाखाची चैन जप्त करण्यात आली आहे.

त्याला २४ जुलै पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषद घेऊन उरण पोलिसांनी दिली आहे.या सोनसाखळी चोरावर नेरुळ,उरण आणि पनवेल मध्ये यापूर्वी पाच गुन्हे दाखल आहेत. यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्यासह आरोपी हा उरण, नवघर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर झाली.

मोहीत गोपाल कोहली वय २६ वर्षे, रा. हरिश्चंद्र पाटील यांची रूम, नवघर गाव, पो. जेएनपीटी, ता. उरण, रायगड, मुळ रा. कॅम्पस रोड, गल्ली -६, धनगडी शहर, कैलाली, देश-नेपाळ याला उरण, नवघर येथुन ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल तपास केला असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. परंतु गुन्हयातील चोरी केलेले दागिन्यांबाबत माहिती देत नसल्याने त्यास सदर गुन्हयात दिर्नाक १५ जुलै २०२५ रोजी अटक करून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांचेकडून गुन्हयातील जबरीने चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात ३ लाख ३७ हजार ४८० रुपये किंमतीचे एक सोन्याची चैन (गोप), त्याचे सोबत बदामाचे आकाराचे पेंडल त्यामध्ये ओम असे लिहलेले एकूण ४३ ग्रॅम ४९० मिली वजनाचे सोन्याचे दागिने गुन्हयात हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यातील दुसरी आरोपी स्वप्नाली उर्फ (सोनु) हरीश्वंद्र पाटील रा. नवधर, ता. उरण जि. रायगड हिचा देखील सहभाग असल्याने तिचा शोध सुरू आहे.