करोनानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात होणार हिंदुनववर्षाचे स्वागत ,२४ शोभायात्रांना पोलीसांची परवानगी

नवी मुंबई शहरात करोनानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, सानपाडा, सीवुडस्‌, ऐरोली आणि वाशी येथे भव्य नववर्ष शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथे हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती तसेच सानपाडा येथे अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यासह विविध २४ ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. सीवुडस्‌ येथे कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेच्यावतीने सेवटर-४२ ते सेवटर-४८ अ मधील श्री वि्ील रखुमाई मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर ऐरोली येथे विविध संस्था एकत्र येऊन ऐरोली, सेवटर-१० मधील श्री सिध्दीविनायक मंदिरापासून सेवटर-८ मधील तुळजाभवानी मंदिरापर्यंत शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सानपाडा येथील स्वागत यात्रेचा प्रारंभ हुतात्मा बाबू गेनू मैदान ते मिलेनियम टॉवर, सेक्टर-१०, ४, ३ हून पुन्हा हुतात्मा बाबू गेनू मैदान अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सीबीडी येथे सकल हिंदु समाज यांच्या वतीने कालीमाता मंदिर ते अलबेला हनुमान मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.वाशी येथील मिरवणुकीमध्ये ढोल ताशा, लेझीम, ब्रास बँड पथक पथक, वारकरी संप्रदाय, इस्कॉन, स्वामी नारायण संस्था, बालाजी मंदिर यांची भजनी मंडळे,दुचाकी फेरी, दश अवतार, चेंदा मेलन, कथक, दशावतार, श्रीमंत गांवदेवी मरीआई मंदिर ट्रस्टचे मंगळागौरी पथक सहभागी होणार आहे. सेक्टर-१४ स्वामीनारायण मंदिर येथून शुभयात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सांगता वाशी, सेवटर-९ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता होणार आहे.सानपाडा, सीवुडस्‌, वाशी, ऐरोली येथील मिरवणुकीत ढोल ताशा, लेझीम पथक,मर्दानी खेळ पथक, ग्रंथदिंडी, मंगळागौरी पथक, वेशभूषा आदिंचा सहभाग असणार आहे.

सीवूड्स येथील हिंदुनववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत महिलांचे लेझीम पथक हे आकर्षण ठरणार असून नागरीकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे.- ललित पाठक, कवि कुसुमाग्रज वाचनालय, सीवूड्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईत हिंदुनववर्षानिमित्त शहरात २४ शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून शांततेत या शोभायात्रा होण्यासाठी पोलीस विभागामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त ,परिमंडळ १