उरण : मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करण्यासाठी वाहतूक विभागाने नेहमीच्या मार्गात बदल केला आहे. यात पळस्पे ते जेएनपीए मार्ग इतर वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. तर गोवा मार्गाने खारपाडा ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या वाहनांना खारपाडा ते साई चिरनेर दिघोडे गव्हाण फाटा मार्गे टी पॉईंट कलंबोली मार्गे पनवेल शीव मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने केल्या आहेत.
त्यानुसार प्रवेशबंदी :- गोवामार्गे मुंबई, नवी मुंबईकडे व जेएनपीटीकडे येणारे सर्व प्रकारचे वाहनांना पळस्पे सर्कल येथुन जेएनपीटी मार्गावर जाणे करीता प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
यासाठीचा पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- गोवामार्गे मुंबई व नवी मुंबईकडे येणारे वाहनांना खारपाडा येथुन डावीकडे साईगाव, दिघोडेगाव, चिरनेर मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच नवी मुंबई व मुंबईचे दिशेने जाणारी वाहने पनवेल शहर, कळंबोली मार्गाने इच्छीत स्थळी जातील.
गव्हाणफाटा मार्गे जाणारी वाहने यांना प्रवेशबंदी :- जेएनपीटी एनएच-४ वी वरुन तसेच गव्हाणफाटा येथुन किल्ला जंक्शन(नवी मुंबई)कडे येणारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर यासाठी पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- जेएनपीटी एनएच-४ बी वरुन तसेच गव्हाणफाटा येथुन किल्ला जंक्शन कडे येणारे सर्व प्रकारची वाहने गव्हाणफाटा येथुन एनएच-३४८ओ मार्गे सायन-पनवेल महामार्गावरुन कळंबोली सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. आशा सूचना देण्यात आल्या आहेत.