नवी मुंबई : उध्दव ठाकरे पक्षातील आमदार आणि खासदार काय राष्ट्रवादी कॉंग्रेस , कॉंग्रेसचेही अनेक खासदार आमदार शिवसनेच्या संपर्कात आहेत, वेळ आल्यावर तेही शिवसेनेत येणार आहेत, नवी मुंबई महानगर पालिकेवरही भगवा फडकणार आहे असे प्रतिपादन ठाणे महानगर पालिकेचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे. नवी मुंबईत कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. युवा, महिला आणि एकत्रित भव्य मेळावा साजरा केला जाणार असून आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

हेही वाचा… नवी मुंबई : पाच हजारहून अधिक महिला, विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ‘स्वच्छता संग्राम रॅली’तून केला स्वच्छतेचा जागर

हेही वाचा… गढूळ पाण्याची खारघरवासियांना समस्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे लोकसभा खासदारकीला विजय चौगुले यांना खऱ्या अर्धाने पाडले ते राजन विचारे याने.. त्यांच्या विभागात मतदान कमी झाले होते. विचारे यांनी गद्दारी केली होती, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीत खासदार राजन विचार यांचा टांगा पलटी करायचा आहे… कामाला लागा…” असं सांगत निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.