उरण : जासई उड्डाणपुलावरील शंकर मंदिरामुळे उरणकडून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावरील एका मार्गिकचे काम रखडले आहे. यातील अर्ध्या मार्गिकेचे काम पूर्ण करून पुलाची दुसरी मार्गिकाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरण-पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्या आहेत. मात्र उरणकडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा न मिळाल्याने उड्डाणपुलावरून उतरणारी एक मार्गिका रखडली आहे.

जेएनपीए प्रशासन शंकर मंदिराला मंजूर करण्यात आलेली २५ गुंठे जमीन जागेचा अधिकृत ताबा देऊन मंदिरातील शंकराची पिंडी स्थापित करणार नाही, तोपर्यंत मंदिराला हात लावू देणार नाही. तसेच प्रत्यक्ष काम सुरू करा, केवळ तोंडी आश्वासन नको अशी स्पष्ट भूमिका जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी घेतली आहे.

Traffic jam due to repair work on flyover on Mumbai Agra highway nashik news
उड्डाणपुलावरील दुरुस्ती कामामुळे गोंधळ; पूर्वकल्पना नसल्याने वाहनधारकांची गैरसोय, वाहतूक कोंडीत भर
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Cow lying dead, Dahisar toll booth,
दहिसर टोल नाक्याजवळील महामार्गावर १६ तासापासून गाय मृत अवस्थेत पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
Action on encroachments in development plan near Durgadi Fort in Kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे
Chemical tanker accident on mumbai ahmedabad highway
पालघर : महामार्गावर रसायनाचा टँकर उलटला; रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड
Navapada, illegal building at Navapada,
सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार

हे ही वाचा…हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी

या पुलावरील एकच मार्गिका सुरू असल्याने नवी मुंबई आणि पनवेलकडून येणारी तसेच उरणकडून पुलाखालून येणारी प्रवासी वाहने ये-जा करीत असताना वाहनांना शंकर मंदिर येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यात आता पुलाला खड्डे पडल्याने भर पडली आहे. तर नवी मुंबई आणि पनवेलकडून येणारी तसेच उरण कडून पुलाखालून येणारी प्रवासी वाहने ये-जा करीत असताना वाहनांना शंकर मंदिर येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

हे ही वाचा…उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?

वर्षभरापूर्वी जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पनवेलकडे जाणारी पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे उरण ते नवी मुंबई व पनवेल या मार्गाने खासगी व सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. त्याचप्रमाणे जासई नाक्यावरही वाहतूक कोंडी दूर झाली आहे. मात्र जासई उड्डापुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये-जा होत आहे.

हे ही वाचा…उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?

दहा किलोमीटरपेक्षा अधिकचे अंतर कमी

जासई उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी करळ उड्डाणपूल ते धुतुममार्गे गव्हाण फाटा या मार्गाने प्रवास करावा लागत होता. हे जवळपास दहा किलोमीटरचे अंतर कमी झाले असून करळ-जासईमार्गे नंतर थेट गव्हाण फाटा हे अंतर काही मिनिटांत कापता येत आहे.

श्रावणी सोमवारमुळे मंदिरातील गर्दीत वाढ

उरण- पनवेल मुख्य मार्गावर असलेल्या या मंदिरात श्रावणी सोमवारमुळे गर्दी वाढली असून वाढत्या गर्दीमुळे भविकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जेएनपीए प्रशासनाने लवकरात लवकर नवीन मंदिर उभारण्याचा मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे.