News Flash

कुतूहल – मिर्मिकोफिली

बाभळीच्या काही प्रजातींमध्ये मुग्यांना आकर्षति करण्यासाठी अनुकूलन झालेले आढळते.

बाभळीच्या काही प्रजातींमध्ये मुग्यांना आकर्षति करण्यासाठी अनुकूलन झालेले आढळते. अशा वनस्पतींना ‘मर्मिकोफिलस’ वनस्पती म्हणतात. अशा प्रकारे इतरांना आकर्षति करण्याच्या क्रियेला ‘मिर्मिकोफिली’ असे म्हणतात. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथील बाभळीच्या काही प्रजातींना स्वसंरक्षणासाठी पानाच्या दोन्ही बाजूला ३ ते ५ सेमी लांबीचे काटे असतात. काटा फुगीर पोकळ व टोकावर अतिशय तीक्ष्ण असतो. या काटय़ांचा आकार बलाचा शिंगासारखा असतो. म्हणून त्यांना ‘बुल्स हॉर्न’ म्हणतात. दक्षिण अमेरिकेतील बाभळीच्या दोन प्रजातींमध्ये हा चमत्कारिक प्रकार आढळतो. काटय़ांच्या टोकाजवळ राणी मुंगी छिद्र तयार करते अन् काटय़ाच्या पोकळीचा घर म्हणून उपयोग करते. या पोकळीत मुंगी अंडी घालते आणि सनिक मुंग्यांची फौज तयार होते. वृक्षाच्या मूळ, खोड, पान व खोडाचे शत्रू कीटकांपासून संरक्षण करतात आणि इतर कीटकांनी वृक्षावर येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पिटाळून लावतात. हळूहळू वृक्षाच्या इतर काटय़ांमध्ये देखील मुंग्या घर करून राहू लागतात आणि त्या संपूर्ण बाभळीच्या वृक्षावर मुंग्यांचं साम्राज्य पसरते. प्रत्येक पानाच्या तळाशी एक ग्रंथी असते आणि त्यामधून सतत मधुर रस पाझरत असतो. त्याप्रमाणे प्रत्येक पर्णिकेच्या टोकावर अतिशय लहान पिवळ्या रंगाचे अवयव असतात. या अवयवांमध्ये प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ असतात. ग्रंथींमधील स्राव आणि पर्णिकेवरील अवयव या मुंग्यांचे अन्न असते. दक्षिण अमेरिकेतील बाभळीचे सूक्ष्म अवलोकन व अभ्यास निसर्ग विचारवंत ‘बेल्ट’ यांनी केला. म्हणून पर्णिकेवरील या अवयवांना ‘बेल्टस कार्पसल म्हणतात. प्रयोगाअंती असे सिद्ध झाले आहे की जर वृक्षाचे काटे छाटून टाकले आणि मुंग्यांनाही हाकलण्यात आले तर वृक्षांला इजा होण्यास सुरुवात होते. बऱ्याच वेळा मुंग्या वृक्षावरून खाली जमिनीवर उतरतात व वृक्षाच्या लगतचे तण आणि रोपे फस्त करून परिसर मोकळा करतात. अशा प्रकारे मुंग्या आपल्या निवासी वृक्षाचे प्रतिस्पर्धी नष्ट करतात. सहजीवनाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आपल्याला या निसर्गकिमयेतून बघायला मिळतो.
डॉ. सी. एस. लट्टू (मुंबई)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

नगराख्यान – पॅरिसची सत्तांतरे
इसवी सनाच्या पाचव्या शतकात पॅरिसच्या रोमन राजसत्तेचा अस्त झाल्यावर मूळच्या फ्रँक म्हणजे फ्रेंच घराण्यांनी पॅरिसवर राज्य केले. सुरुवातीच्या मेरोविंजियन घराण्याची राजवट तीन शतके झाल्यावर पॅरिसवर कॅरोिलजीयन घराण्याने दोनशे वष्रे राज्य केले. त्यानंतर ह्य़ू कॅपेत याने ९८७ साली आपल्या कॅपेशियन वंशाचे राज्य पॅरिसवर प्रस्थापित केले. पॅरिसवर राज्य करणाऱ्या विविध राजवटींपकी कॅपेशियन वंशाचे राज्य सर्वाधिक काळ टिकले. ९८७ साली स्थापन झालेले कॅपेशियन राज्य इ.स. १७९२ पर्यंत टिकले. आठ शतकांच्या या राजवटीमध्ये कॅपेशियन वंशातील अनेक घराण्यांनी राज्य केले. त्यामध्ये कॅपेत घराणे, व्हालोई घराण्यांतर्गत ओíलयो शाखा आणि गोलेम शाखा आणि बुबरे घराण्याचा समावेश आहे. कॅपेशियन घराण्याच्या अस्तानंतर मात्र पॅरिसच्या सिंहासनावरचा अधिकार एका राजवटीकडे फार काळ टिकला नाही. नेपोलियनने १७९२ साली पहिले प्रजासत्ताक स्थापन केले आणि १८०४ साली त्याने स्वतला फ्रेंच सम्राट घोषित केले. नेपोलियनच्या बोनापार्ट घराण्याची राजसत्ता १८०४ ते १८१४ अशी दहा वष्रे टिकली. सहाव्या आघाडीने नेपोलियनचा पराभव करून एल्बा येथे त्याला स्थानबद्धतेत ठेवले. स्थानबद्धतेच्या एका वर्षांत बुबरे घराण्याचा अठरावा लुई याने राज्य केले. १८१५ साली नेपोलियन स्थानबद्धतेतून शिताफीने निसटून त्याने पॅरिसवर शंभर दिवस राज्य केले. इंग्लंड आणि प्रशिया आघाडीने नेपोलियनचा वाटर्लू येथे पराभव करून त्याला सेंट हेलिना बेटावर अटकेत ठेवले. त्यावेळी त्याचा मुलगा दुसरा नेपोलियन याने केवळ पंधरा दिवस राज्य केले. नेपोलियनच्या पतनानंतर बुबरे घराणे आणि ओíलयो घराण्यांचे राज्य पॅरिसवर झाले. अखेरीस नेपोलियनचा भाचा तिसरा नेपोलियन याचा राज्यकाल इ.स. १८५२ ते १८७० असा झाला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2016 5:58 am

Web Title: myrmecophily
टॅग : Navneet
Next Stories
1 नगराख्यान : पॅरिसची ग्रामदेवता
2 रोमन पॅरिस
3 असे वसले पॅरिस..
Just Now!
X