News Flash

फटाका कारखाना स्फोटातील जखमींना भरपाई द्या

क्कम राज्य शासनाने एका महिन्यात पीडितांना पालघरच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात यावी असेही लवादाने  म्हटले आहे. 

हरित लवादाचे राज्य शासनाला निर्देश

पालघर: डहाणू तालुक्यातील डेहणे पळे (पाटील पाडा) येथील विशाल फायर वर्क्‍स या फटाके उत्पादन कंपनीच्या स्फोटातील नऊ जखमींना भरपाई देण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाला दिले आहेत.

हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्देश देताना या स्फोटात खऱ्या अर्थाने जखमी झालेल्या पीडित कामगारांना कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता ही भरपाई देण्यात यावी असेही म्हटले आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटात पन्नास टक्कय़ांहून अधिक भाजलेल्या/जखमी झालेल्या कामगारांना १५ लाख, २५ ते ५० टक्के जखमींना १० लाख, पाच ते २५ टक्के जखमींना पाच लाख तर बाह्य़ रुग्ण विभागात  उपचार घेतलेल्या जखमींना दोन लाखांची भरपाई द्यावी असे लवादाने म्हटले आहे. ही रक्कम राज्य शासनाने एका महिन्यात पीडितांना पालघरच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सुपूर्द करण्यात यावी असेही लवादाने  म्हटले आहे.  डेहणे पळे पाटील पाडा येथे असलेल्या विशाल फायर वर्क्‍स या फटाके उत्पादन कंपनीत २७ जून रोजी सकाळी आग लागून भीषण स्फोट झाले होते. कारखान्यात वेल्डिंगच काम सुरू असताना ठिणगी पडून आग लागली होती. या प्रकरणात  औद्योगिक सुरक्षा संचालनालय केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी देशामध्ये अशा विविध घटना, त्यातील पीडित, अशा घटनांमुळे पर्यावरणाला होणारा संभाव्य धोका लक्षात घेत अभ्यासगटाच्या माध्यमातून संयुक्तरित्या सर्वेक्षण करून अभ्यास करावा व तसा अहवाल तीन महिन्यांत तयार करावा अशा सूचनाही हरित लवादाने केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 2:32 am

Web Title: compensate injured cracker factory explosion ssh 93
Next Stories
1 वृक्ष लागवड उपक्रमातील एक कोटी झाडे जिवंत
2 डहाणूत वाहतूक कोंडी
3 लसीकरणात उद्योगांना झुकते माप
Just Now!
X