वाडा: वाडा तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व दाटीवाटीने लोकवस्ती असलेल्या कुडूस शहरातील नैसर्गिक नाले येथील विकासकाकडून बुजवले गेले आहेत. त्यामुळे येथील लोकवस्ती भागात यंदा पावसाळय़ात पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कुडूस परिसरात मोठमोठय़ा १० ते १२ कंपन्या असून या कंपन्यांची उभारणी करताना अनेक नैसर्गिक नाले बुजविण्यात आले आहेत. तसेच कुडूस ग्रामपंचायत क्षेत्रात नव्याने अनेक मोठमोठय़ा इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम करताना काही विकासकांनी नैसर्गिक नाले गायब (बुजवले) केले आहेत. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलला तर त्याचे दुष्परिणाम काठावर असलेल्या लोकवस्तीला भोगावे लागतात. काही विकासकांनी तर कुडूसमधील जुन्या विहिरी बुजवूनही बांधकाम केले आहे तर अनेकांनी नाले बुजवून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला आहे. बुजवलेल्या नाल्याच्या जागेवर मोठय़ा इमारतींचे बांधकाम झाल्यामुळे पाणी तुंबून काही ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर येते. नैसर्गिक नाले बुजवून बांधकाम करणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी वाडा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
नैसर्गिक नाले कुणालाही बुजविता येत नाहीत, तशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर निश्चितच संबंधितांवर कारवाई केली जाईल.-उद्धव कदम, तहसीलदार, वाडा तालुका.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2022 रोजी प्रकाशित
कुडूस शहराला पुराचा धोका; विकासकांकडून नैसर्गिक नाले गायब?
वाडा तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व दाटीवाटीने लोकवस्ती असलेल्या कुडूस शहरातील नैसर्गिक नाले येथील विकासकाकडून बुजवले गेले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-05-2022 at 00:09 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood threat kudus city natural streams missing developers wada taluka amy