पालघर: मंगळवारी सायंकाळी ५.०८ वाजता पालघरच्या रेल्वे यार्डात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गीकेवरील रेल्वे सेवा खंडित राहिली होती. सुमारे २६ तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास डहाणू रोड कडून विरारकडे पहिली लोकल गाडी पालघर येथून सोडण्यात आली.

हेही वाचा : पालघर रेल्वे यार्डात मालगाडी घसरली, दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत चालणार

विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांनी काल रात्री बसून दुरुस्तीच्या कामावर स्वतः देखरेख ठेवली. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, सध्या तसेच ५०० पेक्षा अधिक कामगाराने घसरलेल्या डबे सरकविणे, विद्युत वाहिनी पूर्वत करणे, नव्याने रुळांची अंथरणी करणे व आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.

हेही वाचा : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दरम्यान मुंबई कडून गुजरात मार्गीके करून दोन्ही दिशेची वाहतूक आलटून पालटून सुरू ठेवण्यात आली होती. या २६ तासाच्या कालावधी उपनगरीय सेवा खंडित ठेवल्याने दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी यांची हाल झाले