पालघर : रेशन, पाणी आणि रोजगार हमीमध्ये काम द्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेमार्फत सुमारे १२००० महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून कार्यालयाला घेराव घातला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मागण्यांसाठी अनेक वेळा तहसीलदार कार्यालयांकडे आंदोलने केली गेली, मात्र त्यातून काहीही साध्य झाले नसल्याने आज या महिलांनी आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोळगाव येथील पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालय परिसरामध्ये हा संपूर्ण मोर्चा विसावला असून, त्यांना संभाळताना प्रशासनासह पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – पालघर: जंतुनाशक खरेदीत गैरव्यवहार? कचरा ठेक्यानंतर पालघर नगर परिषद पुन्हा वादात

विभक्त कार्डावर रेशन द्यावे, दोन तीन रुपयांना मिळणारे रेशन त्वरित सुरू करावे, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावी, सुरू असलेल्या कामावरची ऑनलाइन हजेरी बंद करावी, हर घर नल जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, विजेचे बील कमी व्हावे, अशा मागण्या महामोर्चाच्या माध्यमातून महिला संघटनेने केल्या.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March of janwadi mahila sangathan at palghar collector office ssb
First published on: 24-05-2023 at 15:16 IST