वाढवण बंदराचा भूमिपूजन समारंभ तसेच मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे आले होते. या दौऱ्यामुळे नेमके काय साध्य झाले याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असले तरीही शहरातील पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यास हा दौरा लाभदायी ठरला.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर या दौऱ्याची खऱ्या अर्थाने आखणी सुरू झाली. वाहनांसाठी पार्किंग, मान्यवरांसाठी व्यवस्था, हेलिपॅडची उभारणी व १५ ते २० हजार नागरिकांसाठी सभामंडपाची उभारणी करणे आवश्यक होते. दरम्यानच्या काळात पालघर व परिसरात पाऊस कोसळत राहिल्याने नियोजित सभेच्या ठिकाणी पाणी साचले व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. अशीच परिस्थिती नियोजित हेलिपॅडच्या ठिकाणी झाल्याने हा दौरा रद्द होतो का याबद्दल साशंकता निर्माण झाली.

1200 acre land near vadhvan port
बड्या उद्योगासाठी ‘एमआयडीसी’कडून भूसंपादन? वाढवण बंदराजवळील १२०० एकर जमिनीची वस्त्रोद्योग केंद्रासाठी निवड
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
railway employees suspended boisar marathi news
बोईसर: विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली; रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

प्रतिकूल परिस्थितीत दौरा यशस्वी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने आर्थिक साहाय्य करण्याची तयारी दर्शविल्याने महसूल, सार्वजनिक बांधकाम, महावितरण व इतर विभागांमध्ये जणू दसरा-दिवाळी सण काही महिने पूर्वीच आल्यासारखा वाटला.

हेही वाचा : पालघर : घरगुती वादातून माय लेकीची निर्घुण हत्या; आरोपी दिर आणि नणंद यांना अटक

उपलब्ध निधीचा पुरेपूर वापर करत शेकडो गाड्या खडी टाकून त्यावर काही दिवस सातत्याने रोलिंग करून सभा मंडपासाठी जमिनीची तयारी करण्यात आली. असे असले तरी पावसामुळे खडीमधून पाणी वर येत राहिल्याने व्हीव्हीआयपी व व्हीआयपी विभागातील सुमारे तीन हजार आसन व्यवस्थेच्या ठिकाणी हजारो लाकडी फळी (प्लाय)चे तुकडे अंथरून हंगामी व्यवस्था उभारण्यात आली. मात्र ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना बसावे लागले त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेला ग्रिटयुक्त चिखल पसरला होता.

पंतप्रधानांच्या शिष्टाचार प्रणालीनुसार त्यांच्यासाठी चार हेलिपॅड उभारणे आवश्यक होते. शिवाय इतर मान्यवरांसाठी अतिरिक्त हेलिपॅड पोलीस परेड मैदानावर उभारण्याचे निश्चित करण्यात आले. सभामंडपाच्या ठिकाणाप्रमाणेच खाली रेतीखडी व वर चार सिमेंटकाँक्रीटचे हेलिपॅड उभारण्यात आले. त्याचबरोबर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी असलेल्या प्रमाणित नियमानुसार हेलिपॅडजवळ असणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी सरकवून पालघर सबस्टेशन ते जेनेसिस सबस्टेशनदरम्यानच्या वाहिनीचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे पालघर शहराला कायमस्वरूपी चार हेलिपॅड व सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडी मिळाली. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी राहिली आहे.

पंतप्रधान यांच्या दौऱ्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच पालघर-बोईसर रस्त्यावर डांबरी थराचा मुलामा करण्यात आला. त्यामुळे गणपती काळापर्यंत रस्त्यांची अवस्था चांगली राहील असे अपेक्षित आहे. पंतप्रधानांसाठी सिडको मैदानापर्यंत स्वतंत्र काँक्रीटचा रस्ता व पर्यायी मार्ग बनवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या संपूर्ण सभेच्या आयोजनासाठी ४८ ते ५० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काम झाले की पैसा हा आलाच या उक्तीप्रमाणे अनेक शासकीय विभागांना अचानक लॉटरी लागल्याप्रमाणे आनंद झाला. अखेरचे काही दिवस सर्व विभागांना कार्यक्रम स्थळ सुसज्ज करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करावी लागली. तरीसुद्धा कर्तव्याचा भाग व पंतप्रधान दौऱ्याचे सफल आयोजन झाल्याने मेहनतीचा क्षीण नाहीसा झाला.

हेही वाचा : पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !

अलीकडच्या काळात इतक्या मोठ्या स्वरूपात प्रथमच कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने तसेच पाऊस सुरू राहिल्याने आयोजनातील येथील अनेक बाबी अपेक्षित प्रमाणात होऊ शकल्या नाहीत. सभामंडपात व विशेषत: अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या दालनामध्ये थंड वाऱ्यासाठी केलेली व्यवस्था व ध्वनिक्षेपकाची व्यवस्था परिपूर्ण नसल्याचे दिसून आले. १५ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती असताना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याने अनेक उपस्थितांना चार तासांपेक्षा अधिक अवधी तहानलेले राहावे लागले.

पंतप्रधान यांच्या सभेसाठी नागरिकांनी ११ वाजता सभास्थानी आसनस्थ व्हावे असे अपेक्षित असल्याने नंतरच्या दोन अडीच तासांमध्ये नागरिकांची करमणूक करण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. मात्र केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाकडून कार्यक्रमाच्या दृष्टीने अपेक्षित पूर्वतयारी न झाल्याने ऐन संगीताच्या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात पंतप्रधानांकडून उद्घाटन होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्यातील घटनांचा क्रम व त्याचे व्हिडीओ नागरिकांना पाहावयास मिळाले. त्यामुळे ‘सिंगल दाम में डबल मजा’प्रमाणे दोन वेळा उपस्थितांना उद्घाटन सोहळ्याचा आनंद लुटता आला.

बाहेरगावाहून नागरिकांना आणण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनांना खुला मार्ग मिळावा म्हणून चक्क मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली होती. महिनाअखेर असल्याने कच्चा माल घेणे व तयार मालाला विक्रीसाठी बाहेर काढण्याचे उद्दिष्ट विविध उद्योगांना असताना बंद केलेल्या अवजड वाहतुकीमुळे अनेक उद्योगांना त्रासाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे पालघर बोईसर मार्ग व शहरातील काही मार्गांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र या संदर्भात अगोदरच्या सायंकाळी उशिरा सूचना दिल्याने स्थानिक मंडळींना देखील गैरसोयीला सामोरे जावे लागले.

हेही वाचा :बोईसर: विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली; रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

मंडपाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात नागरिक आल्याने अनेक बस गाड्या अर्ध्या रस्त्यातून परत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना सभामंडपापासून काही दूरवर रोखून ठेवण्यात आल्याने त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली. प्रत्यक्षात कार्यक्रमाचे आयोजन, नीटनेटके व आटोपते झाल्याने आयोजकांनी केलेल्या मेहनतीबद्दल समाधान वाटले. कार्यक्रमात आयोजनाबाबत व त्यामध्ये मान्यवरांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांबद्दल वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत असले तरी पालघर शहराच्या व परिसराच्या पायाभूत सुविधांच्या सुधारण्यासाठी हा दौरा अत्यंत लाभदायी ठरला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

काळ्याची भीती

वाढवण बंदराला स्थानिक नागरिकांचा व मच्छीमारांचा विरोध असल्याने डहाणू तालुक्यात अनेक आंदोलने छेडण्यात आली होती. या आंदोलकांपैकी काही मंडळी सभामंडपात शिरकाव करून घोषणाबाजी, नारेबाजी अथवा काळे झेंडे फडकवतील या भीतिपोटी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सभेसाठी काळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेल्या अनेकांना सभेच्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला. या संदर्भात आगाऊ सूचना देण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याने तसेच आयोजकांना काळ्या रंगाची भीती वाटत असल्याने अनेक नागरिकांना पंतप्रधानांच्या भाषणाचा आनंद घेता आला नाही.