एकाच दिवशी तीन अपघातांत दोघांचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे बुधवार २९ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला आहे.

pg accident
एकाच दिवशी तीन अपघातांत दोघांचा मृत्यू

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे बुधवार २९ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये चालक अझरुद्दीन खान यास किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात कंटेनर आणि त्यामधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

कंटेनरमध्ये तेलसदृश पदार्थाची वाहतूक केली जात होती. अपघातामुळे तेल महामार्गावर सांडले होते. यामुळे रस्ता निसरडा झाला असून वाहतूक विस्कळीत झाली होती. दुसऱ्या एका घटनेत आंबोली येथील कठीयावाडी हॉटेलमधील कामगाराचा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात प्रवास करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.

तर कासा-सायवन राज्य मार्गावर बांधघर येथे रस्त्याच्या कामासाठी निघालेल्या रोडरोलरवरील कामगार तोल जाऊन पडून चिरडून मृत्युमुखी पडला. कासा पोलीस ठाणे हद्दीत वरील तिन्ही अपघात घडले असून या बाबतचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 00:02 IST
Next Story
पालघर: कनिष्ठ झिंबाब्वे संघाचा सफाळ्यात सराव
Exit mobile version