
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी खूप कमी शिक्षण घेतले आहे, तर काही स्टार्स असे आहेत ज्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यापैकी काहींनी तिथे अभिनयाचा कोर्स केला आहे तर काहींनी मार्केटिंगची पदवी घेतली आहे. रणबीर कपूरबद्दल सांगायचे तर, रणबीरने न्यूयॉर्कच्या स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे. (photo: ranbir kapoor/ instagram)
मेलबर्नमध्ये शिकत असताना, रणदीप हुड्डा यांनी आधी मार्केटिंगमध्ये बॅचलर आणि नंतर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.(photo: randeep/ instagram)
परिणीती चोप्राने एक नाही तर तिहेरी सन्मान पदवी घेतली आहे. त्यांनी फायनान्स, बिझनेस आणि इकॉनॉमी या विषयांचा अभ्यास केला आहे.(photo: Parineeti Chopra/ instagram)
कमल हसन यांची मुलगी श्रुती हासनने म्युझिकियन्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅलिफोर्नियामधून संगीताचे शिक्षण घेतले आहे. (photo: shruti hassan/ instagram)
अभिषेक बच्चनने स्वित्झर्लंडच्या एग्लॉन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी बोस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला, मात्र येथून शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर ते भारतात परतले.
रणवीर सिंगने अभिनयात येण्यापूर्वी अमेरिकेतील ब्लूमिंग्टन येथील इंडियाना विद्यापीठातून कला शाखेत पदवी संपादन केली.
सारा अली खानने न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. (all photo: instagram)