Who will be CM if Mahayuti Wins: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होईल? याबाबतची चर्चा आता सुरू करण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने या चर्चेला तोंड फोडले आहे. जर निकालानंतर भाजपा हा मोठा पक्ष म्हणून जर पुढे आला, तर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर आल्याचे पाहायला मिळू शकते, असे संकेत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या अलीकडच्या विधानातून मिळत आहेत. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना अमित शाह म्हणाले की, सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत; पण निकालानंतर महायुतीमधील तीनही घटक पक्ष एकत्र बसून, मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील.

अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सांगली जिल्ह्याच्या शिराळा येथील जाहीर सभेत बोलताना अमित शाह यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की, आपल्या सर्वांना महायुतीला आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत आणायचे आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Worli Constituency Assembly Election 2024 Worli Chairs That Will Give A Unique Challenge To Aditya Thackeray Mumbai news
वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना अनोखे आव्हान देणाऱ्या खुर्च्या; शिवसेनेची (एकनाथ शिंदे) प्रचाराची अनोखी शक्कल
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाजपाच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तळागाळात राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हवे आहेत. हीच अनेकांची भावना आहे. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मुख्यमंत्री कोण होणार? हा आता त्यांच्या अजेंड्यावरील विषय नाही.

हे वाचा >> Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने सांगितले की, भाजपाच्या नेत्यांनी जरी मुख्यमंत्री पदाबाबत संकेत दिले असले तरी निकालानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्यासाठी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि निवडणुकीनंतरही तेच मुख्यमंत्री राहतील.

दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, सध्या आमचे लक्ष्य महायुतीला पुन्हा सत्तेत आणणे हे आहे. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय आम्ही निकालानंतर पक्षनेतृत्वाकडे सोपवू. तथापि, युतीचे सरकार चालवत असताना मुख्यमंत्री पदावर कोण बसणार? याला बरेच महत्त्व असते. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांतील नेते अद्याप या विषयावर स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत.

महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच

महायुती ही महाविकास आघाडीविरोधात एकवटलेली असली तरी आपापल्या पक्षाची ताकद वाढविण्यावर तीनही पक्ष भर देत आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा पसंती देण्याबाबत दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धाडसी निर्णय घेत कल्याणकारी योजना राबविल्या होत्या. तसेच २०२२ साली त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना महायुतीत सामील करून घेण्यासाठी पक्षहित डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले होते. जर यापुढे भाजपा बहुमताच्या जवळपास पोहोचला, तर या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये, अशी पक्ष आणि संघाची भावना आहे.

२०१९ साली जेव्हा भाजपाने संयुक्त शिवसेनेसह निवडणूक लढविली होती, तेव्हा भाजपाने जनादेश यात्रा काढून पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, हे जाहीर केले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला १०५, तर त्याखालोखाल शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये खटके उडाले. त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडी जन्माला आली. मात्र, हे सरकार केवळ अडीच वर्षेच टिकू शकले. त्यावेळी शिवसेनेचे ५६ पैकी ४१ आमदार एकनाथ शिंदेंसह बाहेर पडले होते.

२०२२ साली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद बहाल करताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर बसण्याची भूमिका मांडली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली; पण त्यांना केवळ नऊच जागा जिंकता आल्या. २०१९ साली असलेली खासदारांची २३ ही संख्या यंदाच्या निवडणुकीत थेट नऊवर आली. त्यानंतर फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री पदावरून मोकळे करावे, अशी मागणी पक्षाकडे केली होती. राजीनामा देऊन पक्षसंघटना बळकट करण्यासाठी झोकून द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते; पण केंद्र सरकारने त्यांची मागणी धुडकावून लावली.

लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता भाजपाने आपल्या चुका सुधारल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असले तरी त्यांना हे पद मिळवून देण्यासाठी भाजपाला महायुतीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे यावे लागेल, अशी भावना पक्षामधील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जर जागा कमी झाल्या, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शिरजोर झाल्याचे पाहायला मिळेल, अशीही प्रतिक्रिया सूत्रांनी दिली.