दयानंद लिपारे

कोल्हापूर : अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थाना नंतर ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कारवाईकडे लक्ष पुरवले आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीसाठी मुंबईला नेल्याने ईडीच्या कामकाज पद्धतीवर कर्मचारी, कर्मचारी संघटना यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यातून ईडी, मुश्रीफ, त्यांचे समर्थक, कामगार संघटना असा संघर्षाचा परिघ वाढत चालला आहे. त्यातून भाजपच्या विरोधात वातावरण तापले आहे.

हेही वाचा >>>शेकापच्या अस्तित्वाचाच प्रश्न

भाजपने हसन मुश्रीफ यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार केली. त्यावर प्रथम प्राप्तिकर विभागाने तर आता ईडीने चौकशीचा ससेमिरा मुश्रीफ यांच्यामागे लावला आहे. मुश्रीफ यांच्या कागल, पुणे येथील निवासस्थानावर गेल्या महिन्यात छापेमारी केल्यानंतर ईडीने मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळवला आहे.

हेही वाचा >>>जम्मू-काश्मीर : अतिक्रमणविरोधी कारवायांवरून ओमर अब्दुलांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, “घरांवर बुलडोझर चालवणे…”

ईडी – मुश्रीफ संघर्ष नव्या वळणावर

गेल्या आठवड्यात या बँकेत अधिकाऱ्यांनी दोन दिवस चौकशी केली. महत्त्वाची कागदपत्रे हाती घेतली आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांची दीर्घकाळ कसून चौकशी केली जात होती. दुसऱ्या दिवशी बँकेतून बाहेर पडताना ईडीच्या पथकाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. ईतकेच नव्हे तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह ५ प्रमुख अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. त्यांची ईडीच्या मुंबई कार्यालयातही चौकशी करण्यात आली. हे पाहता ईडीने मुश्रीफ यांच्या विरुद्धची चौकशी पुढील टप्प्यावर सुरू ठेवली आहे. या निमित्ताने ईडी – मुश्रीफ यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर आला आहे.

ईडी विरोधात वातावरण निर्मिती?

कागल येथील मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तिकर व ईडीने छापेमारी केली तेव्हा दोन्ही वेळी मुश्रीफ समर्थक मोठ्या संख्येने घराजवळ जमले होते. पोलिसांचे कडे तोडून कार्यकर्त्यांनी घराकडे धाव घेतली होती. तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या छापेमारी वेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा रोष दिसून आला. ईडीच्या पथकाने बँकेत पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. दुसऱ्या दिवशीही हे सत्र पुढे सुरू राहिले. ३० तासाच्या चौकशीमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. ईडीचे पथक बँकेतून बाहेर पडत असताना बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेवर कारवाई करणाऱ्या केंद्र शासनाच्या निषेध असो अशा शब्दात घोषणा दिल्या. यावेळी बँकेच्या दोन्ही कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनीही ईडीच्या कामकाज पद्धती विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. ईडी विरोधात वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>>Tripura poll : “त्यांना राम आणि कृष्णाच्या अस्तित्वावर शंका”, कांग्रेस आणि डाव्यांवर बरसले योगी आदित्यनाथ

कामगार संघटना आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक एम्प्लॉय युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी यावर भाष्य केले आहे. कोल्हापूर बँक अतिशय चांगली चालली असताना ईडीने बेजबाबदार कारवाई करणे हे त्या वित्त संस्थेबद्दल बेपर्वा असल्याचे द्योतक आहे. यामागे पक्षीय व गलिच्छ राजकारण कारणीभूत आहे. अशा पद्धतीच्या कारवाई पुन्हा प्रयत्न झाला तर संघर्षाची भूमिका कर्मचारी घेतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी ईडीच्या २२ अधिकाऱ्यांनी बँकेतील ३० कर्मचारी, अधिकाऱ्यांचा अमानुष छळ केला, असे म्हटले आहे. ३० तासाच्या चौकशीनंतर आरोग्य बिघडण्याने सुनील लाड या अधिकाऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला. अन्य काही अधिकाऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे. याला जबाबदार असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कागल येथे मुश्रीफ समर्थकांनी दोन वेळा तर कोल्हापूर येथे बँक कर्मचाऱ्यांनी कारवाई विरोधात घेतलेली भूमिका घेतली. दोन्हीवेळच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी ईडीच्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. यातून ईडी, मुश्रीफ आणि समर्थक, बँक कर्मचारी यांच्यातील ताणतणाव अधिकच वाढत चालला असल्याचे दिसत आहे.