आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना ‘कटपुतली मुख्यमंत्री’ म्हटलं आहे. याशिवाय ते स्वत:चा सहायकही बदलू शकत नाहीत, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इशुदान गढवी यांच्या प्रचारासाठी देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे ते एका सभेत बोलत होते. यावेळी केजरीवालांनी भाजपा आणि काँग्रेसमध्ये गुप्तरित्या सामंजस्य असल्याचाही आरोप केला आहे.

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, ‘‘गुजरातच्या जनतेसमोर दोन चेहरे आहेत. एक इशुदान गढवींचा आणि दुसरा भूपेंद्र पटेल यांचा. तुम्ही कोणाला मत द्याल, तुम्ही कोणाला मुख्यमंत्री बनवाल?, गढवी हे तरूण, सुशिक्षित आहेत, ज्यांच्या मनात गरिबांबद्दल विचार आहेत आणि ते शेतकरी पुत्र आहेत. जेव्हा ते टेलिव्हिजनवर कार्यक्रम सादर करत होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे उचलले आणि तूतू-मैमै नाही केली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आणि आपले जीवन शेतकरी व बेरोजगार तरुणांसाठी समर्पित केले.”

हेही वाचा – “ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही २५ वर्षे निवडून आलात…” ; हर्षवर्धन जाधवांची चंद्रकांत खैरेंवर टीका

याचबरोबर केजरीवालांनी हेही सांगितलं की, ‘‘दुसऱ्या बाजूला भूपेंद्र पटेल आहेत. त्यांना काहीच अधिकार नाहीत. ते कटपुतली आहेत. ते आपला सहायकही बदलू शकत नाहीत. ते चांगेल व्यक्ती आहेत, वाईट नाहीत. मी तर ऐकलय ते खूप धार्मिकही आहेत. मात्र त्यांचं कोणीच ऐकत नाहीत. ते कठपुतळी मुख्यमंत्री आहेत.”

केजरीवाल यांनी दावा केला की, ‘‘खंभालियामध्ये सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यांनी म्हटले की, खंभालियामधील लोक त्यांच्या सभेत सहभागी झाले नाहीत आणि आज हजारो लोक इथे आले आहेत. ते आपला मुलगा इशुदानला मुख्यमंत्री बनवण्यासाठी आले आहेत.”

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींच्या वक्तव्यावरून हर्षवर्धन जाधवांचा भाजपावर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर तर ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आप पक्षाने गुजरातमध्ये सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर मागील २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.