मुंबई: शिवसेनेला नकली म्हणणारे उद्या रा. स्व. संघाला नकली म्हणतील हे मी व्यक्त केलेले भाकित भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीवरून स्पष्टच झाले आहे. कारण नड्डा यांनीही संघाची उपयुक्तता संपल्याचे विधान केल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शनिवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रत महाविकास आघाडीला ४८ पैकी ४६ जागा मिळतील असा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी खरगे यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तर, सर्वच्या सर्व ४८ आघाडीला मिळतील, असे ठाकरे यांनी सांगतले

हेही वाचा : “पूर्वी भाजपाला RSS ची गरज लागत होती, आता…”, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपा स्वयंपूर्ण आहे!”

खरगे म्हणाले की काँग्रेसच्या जाहीरनामयात जी आश्वासने दिली आहेत, त्यावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून किमान समान कार्यक्रमावर तयार केला जाईल. काँग्रेसचा जाहीरमामा मुस्लिम लीग साठी तयार केला आहे, अशी टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हणतात माओ वादयांची त्यावर छाप आहे, मोदी एकावर कुठलयातर विधानावर ठाम, रहा, तुम्हीच माओचे बाप आहात, असा प्रतिहल्ला त्यांनी मोदींवर केला. माझ्या देशभक्त बंधु भगिनीनो या शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही आहेत असा टोला ठाकरे यांनी भाजपला लागला. या देशातील हिंदु, मुस्लिम, शिख, इसाई, सर्व देशभक्त आहेत असे ते म्हणाले. राहुल गांधी आता निवडणुका होईपर्यंत सावरकरांबददल काही बोलत नाहीत, अशी टीका भाजप करीत आहे, त्यावर हा काही निवडणुकीतील मुद्दा आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला.

हेही वाचा : अतिशयोक्ती करणाऱ्या पंतप्रधानाकडे सांगण्याजोगे आहेच काय?-खरगे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण, राहुल गांधी आहेत का, असे विचरले असता, पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपकडे एकच चेहरा आहे आणि तोही आता चालत नाही असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करून आम्ही आमचा नेता निवडू असे त्यांनी सांगितले.